बँकेला प्राप्त सन्मान हा सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, ग्राहक व हितचिंतकांच्या अतुट विश्वासाचे प्रतिक : डॉ. संतोषकुमार कोरप


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  2022-10-22
   

अकोला : दि अकोला- वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने अकोला व वाशिम जिल्ह्यातील शेतकरी तथा ग्राहकांच्या सेवेत ११३ व्या वर्षात पदार्पण केले आहे. बँकेच्या शताब्दी नंतर बँकेचा प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचावत ठेवणे करीता बँकेचे संचालक मंडळ प्रयत्नशिल आहे. बँकेच्या प्रगतीचे विविध टप्पे गाठतांना संचालक मंडळाने स्पर्धेच्या बँक अधिकाधिक सक्षम रितीने कार्यरत राहील याकरीता विविध प्रकारच्या ठेवीच्या कर्जाच्या योजना कार्यान्वीत केल्या आहेत. तसेच ग्राहकांकरीता डिजीटायझेशन अंतर्गत मोबाईल अॅप व फोन पे, गुगल पे तसेच विविध डिलेव्हरी चॅनल्स मार्फत बँकेने ग्राहकांसाठी अनेक सेवा सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहे. या सुविधांच्या माध्यमातून खात्याचे बॅलन्स पाहणे, खातेउतारा प्राप्त करणे, मोबाईल रिचार्ज, डीटीएच रिचार्ज, ईलेक्ट्रीक बिल, निधी हस्तातंरण इ. व्यवहार सहजतेने हाताळता येते. बँकेवरील जनमानसातील विश्वासामुळे बँक सातत्याने प्रगती पथावर राहून देश पातळीवर बँकेला विविध सन्मान प्राप्त झाले आहेत. देश सेवेचा एक भाग म्हणुन बँक सुलभ कर्जावर मागेल त्याला सोलर सिस्टीम देण्याचा प्रयत्न करते व याचा प्रचार देखील करते. ह्या प्रयत्नाचा दुसरा भाग म्हणुन बँकेने स्वमालकीच्या सर्व इमारतींवर रेनवॉटर हार्बेस्टींग सिस्टीम बसवुन जलसंधारणाचे कार्यात देखील भाग घेतलेला आहे. ग्रामिण भागातील शेतकरी, शेतमजूर व बँकेचे ग्राहक यांना तालुक्याचे ठिकाणी अगर शाखेचे ठिकाणी येणेसाठी चा खर्च लागू नये. तसेच बँकींग सेवा त्यांना त्यांचे गावातच मिळावी याकरीता बँकेने २५० ग्राहक सेवा केंद्र अकोला व वाशिम जिल्ह्यात स्थापन केली आहेत. यामाध्यमातुन ग्राहक सेवा अधिक सक्षम करणेचा बँकेचा प्रयत्न आहे. बँकेने प्रगतीचा आलेख अनेक वर्षापासुन उंचावत ठेवून करीत असलेल्या कार्याबाबत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक कार्यरत असल्याचा अभिमान वाटतो असे गौरवद्गार भारताचे गृहमंत्री तथा सहकार मंत्री मा. अमीत शहा यांनी काढले. तसेच १२ ऑगस्ट २०२२ रोजी आयोजित ग्रामीण सहकारी बँकेच्या राष्ट्रीय संमेलनात बँकेला शतकोत्तर करीत असलेल्या कार्याबद्दल विशेष गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे. मिळालेला सन्मान हा सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, बँकेचे ग्राहक व हितचिंतक यांचा बँकेवरील अतुट विश्वासाचे प्रतिक असल्याचे बँकेचे संचालक मंडळाचे मत आहे.ह्या वेळी दि अकोला- वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अकोला चे CEO अनंत वैद्य उपस्थित होते.
            पत्रकार परिषद आणि स्नेह भोजनाच्या व्यवस्थेमध्ये व्यवस्थापक मंडळी प्रशासकीय अधिकारी प्रशांत उकंडे,जनसंपर्क अधिकारी मोहन अप्तुरकर व अधिकारी कर्मचाऱ्यांची सहकार्याची विशेष भुमिका होती.

Connection failed: Operation not permitted