प्रा.डॉ.जयपाल पाटील यांना आपत्तीव्यवस्थापन कार्याची 2 री डॉक्टरेट प्रदान


 विश्वप्रभात  29 Oct 2025, 6:26 PM
   

नवीदिल्ली : संपुर्ण देशभरात आपत्तीव्यवस्थापन कार्या सोबत सामाजिक, शैक्षणिक, साहित्यिक, कृषी,क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल पं.दीनदयाळ उपाध्याय हिंदी विद्यापीठ वृंदावन धाम मथुरा,उत्तर प्रदेश यांनी होटेल रेडीसन ब्ल्यू पश्चिम विहार येथील कार्यक्रमात प्रा.डॉ.जयपाल पाटील यांना "विद्यावाचस्पती" ऑनररी डॉक्टरेट  पदश्री अनिल कुमारजी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.मान्य वराच्या हस्ते पत्र,शाॅल विद्यापीठाचे कार्यवृतांत पुस्तक देण्यात आले. यावेळी व्यासपिठावर पद्मश्री अनिल कुमार, डॉ.रवींद्र  द्विवेजी,डॉ.सच्चिदानंद रायजी,डॉ.किरण हे उपस्थित होते. आपत्तीव्यवस्थापन चे अफाट कार्य व समाज सेवा,शोध कार्य विभागात मागील 30वर्ष विविध क्षेत्रातील  कार्याच्या आधारावर विद्यापीठाच्या कार्यकारिणीने विद्यावाचस्पती सारस्वत सन्मान कुलगुरू डॉ.ईदुं भुषण  मिस्र "देवेनदु "व कुलसचिव यांच्या कडुन  प्रमाणपत्र देण्यात आले.यापुर्वी शेती व समाज सेवेत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल छत्रपती शिवाजीमहाराज लोक विद्यापीठ अमरावतीने आँनररी डाॅक्टरेट प्रदान केली होती .पुरस्कार समारोपात डॉ.जयपाल पाटील यांचे मनोगत व्यक्त करतानां पं.दीनदयाळ यांचे कार्य व समाजात  विशेष कार्य करणाऱ्याचे सन्मान विद्यापीठ करीत असल्याबद्दल कार्य कारीणीचे अभिनंदन करून पावसाळ्यात आकाशातील वीजेबाबत केंद्र सरकार ने दामिनी अँप ची व नव्या वाहन कायद्याची,दोन चाकी,चार चाकी अपघातात रुग्ण वाहिकेची मदत करावी त्या साठी केंद्र सरकार कडुन रोख रक्कम बक्षीस देण्यात येते याची माहिती दिली. उपस्थितांना दिली.संपुर्ण देशभरातून  36जणांना सन्मानित करण्यात आले.

    Post Views:  40


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व