लोकस्वातंत्र्यच्या पंकज राऊत व जगदिशप्रसाद करोतिया यांना पद्मश्री मनिभाई राष्ट्रसेवा पुरस्कार!
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
2023-05-04
बोईसर - पत्रकारिता, सामाजिक व विविध सेवाक्षेत्रातून बोईसरमधील सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय व्यक्तिमत्व असलेले दोन ज्येष्ठ पत्रकार,लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेचे कोकण विभाग संघटक पंकजजी राऊत व पालघर जिल्हाध्यक्ष जगदिशप्रसादजी करोतिया यांना पद्मश्री मनिभाई देसाई राष्ट्रसेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुणे येथे निती आयोग संलग्नित व विविध घटनात्मक संस्थांकडून मान्यताप्राप्त मनिभाई देसाई प्रतिष्ठाणाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या दिमाखदार सोहळ्यात बोईसरमधील दै.लोकमत मुंबई आवृत्तीचे प्रतिनिधी पंकजजी राऊत व साप्ता.नवा हाल वृत्तपत्र व न्यूज पोर्टलचे मुख्य संपादक जगदिशप्रसादजी करोतिया या दोन ज्येष्ठ पत्रकारांना महाराष्ट्रातील इतर पुरस्कारार्थींसोबत या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.

राष्ट्रीय विकासामध्ये अग्रणी आणि ग्रामविकास व लोककल्याणकारी कार्यात आयुष्य घालविणाऱ्या स्व.मनिभाई देसाई यांच्या जयंतीदिनी येरवड्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सांकृतिक सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला.डॉ.रविन्द्र भोळे यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाला लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख व ईतर मान्यवरांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती होती.
प्रवचन तथा प्रबोधनकार,अपंगसेवी व विविध क्षेत्रातील ज्येष्ठ समाजसेवक ह.भ.प.डॉ.रविन्द्र भोळे हे संस्थापक अध्यक्ष असलेल्या या संस्थेकडून गेल्या ३० वर्षापासून विविध क्षेत्रातील नामवंतांना या राज्यस्तरीय पुरस्कारांनी गौरविण्यात येते. प्रोत्साहनात्मक उर्जाशक्तीने सामाजिक आणि राष्ट्रीय विकासाच्या कार्याला गतिमान चालना देण्याचा हा मनिभाई देसाई प्रतिष्ठाणाचा उपक्रम आहे. पंकजजी राऊत आणि जगदिशप्रसादजी करोतिया यांना बोईसरमधील पत्रकारिता आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने आणि तात्विक सेवाभावी वाटचालीने समाजात मानाचे स्थान असून त्यांना मिळालेल्या या बहूमानाबध्दल त्यांचे स्नेही हितचिंतक,सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांकडून सर्वत्र अभिनंदन होत आहे.
Post Views: 301