शुभ मंगलम सामूहिक विवाह सोहळे ही काळाची गरज : प्राचार्य डॉ देवेंद्र भोंगाडे


आठ आदिवासी जोडपे विवाह बंधनात अडकले; जीवन विकास विद्यालयात शुभमंगलम विवाह सोहळा संपन्न
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  19 May 2022, 11:52 AM
   

धारणी (संजय लायदे)  -- शुभ मंगलम सामूहिक विवाह सोहळे ही आजच्या पिढीसाठी काळाची गरज असल्याचे प्रतिपादन प्राचार्य डाँ देवेंद्र भोंगाडे यांनी व्यक्त केले. धारणी तालुक्यातील जीवन विकास विध्यालय दहेंडा येथे अंत्योदय मिशन देवग्राम च्या वतीने आठ आदिवासी जोडप्याचा शुभमंगलम विवाह सोहळा संस्थेच्या स्वखर्चाणे मोठ्या थाटामाटात पार पडला त्याकरिता परिसरातील आदिवासी बांधवानी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. 

मेळघाटातील धारणी तालुक्यात अंत्योदय मिशन देवग्राम चे संस्थापक अध्यक्ष डॉ भाऊसाहेब भोगे यांनी आदिवासी बांधवाच्या गरीब परिस्थितीचे चटके लक्षात घेता या आधी अनेकदा सामूहिक विवाह सोहळे कन्यादान योजना आरोग्य शिबिर कुपोषण मुक्ती अभियान  बालविवाह मुक्ती अभियान निराधाराना आधार मदत शेतकरी स्वावलंबन योजना यावर  त्यांनी मेळघाटात निस्वार्थ कार्य केले केले त्याच धर्तीवर  सामाजिक उपक्रम म्हणून जीवन विकास विध्यालय दहेंडा येथे संस्थेच्या स्वखर्चातून सामूहिक विवाह सोहळ्याचे बुद्धपोर्णिमेला सायंकाळी 7 वाजता मोठ्या थाटामाटात आयोजन केले होते त्या विवाह सोहळ्यात परिसरातील आठ आदिवासी जोडप्यानी आपला सहभाग नोंदवून विवाह सोहळ्याला हजेरी लावली जीवन विकास विद्यालयाचे प्राचार्य संजय लायदे सह सर्व शिक्षक वृन्दानी  पुढाकार घेऊन परिसरातील गावखेड्यात सामूहिक विवाह सोहळ्याचा प्रचार प्रसार करून नवविवाहित  वर वधु यांचे लग्नाचे वय पूर्ण आहे किंवा नाही याबाबत कागद पत्राची पडताळणी करून विवाहयोग्य जोडप्याचा सहभाग नोंदवून घेतला बुधपोर्णिमेला सायंकाळी 6 वाजता जीवनविकास विद्यालयाच्या प्रांगणातुन नवरदेवाची बंदबाज्याच्या वाज्यागाज्यात गावातून वरात निघाली ती वरात लग्नस्थळी पोहचल्या नंतर कार्यक्रमाला उपस्थित संस्थेचे संचालक  डॉ देवेंद्र भोंगाडे प्रा डॉ योगेश सरोदे प्रा डाँ दीपक अळसपुरे सामाजिक कार्यकर्ते हाजी फहिम सेठ लालाजी जोशी समाजसेविका अरुणा ताई भावसार  व्यायावसायिक सुनील परिहार संपादक उमेशजी लोटे प्राचार्य संजय लायदे माजी सरपंच बाबाराव भिलावेकर बाबा मावस्कर भारत कासदेकर मनसाराम भिलावेकर किशोर पटेल तुकाराम जावरकर पन्नालाल कासदेकर सुशी ला चिमोटे मीना कासदेकर पुनई धुर्वे चनदाबाई कासदेकर बुडी कासदेकर बसंती कासदेकर या प्रमुख पाहुन्याच्या उपस्थीतीत आदिवासी बांधवांच्या रितिरिवाजा प्रमाणे व राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या लिखित मंगलास्टके सुभाष यनोरकर वंदना यनोरकर प्रा वैरागडे यांनी गायन करून  आठ आदिवासी जोडप्याचा मोठा थाटामाटात व  सर्वांचे शुभ आशीर्वाद घेऊन विवाह सोहळा संपन्न झाला त्यांनतर संस्थेच्या वतीने मुलीचे कन्यादान करण्यात आले व सामाजीक कार्यकते फहिंमसेठ यांच्या कडून सर्वांना गिफ्ट व सुनील परिहार यांच्याकडून घरघुती वापरा करिता पाच स्टील भांडे भेटवस्तू म्हणून देण्यात आले व सर्व पाहुणे मंडळी सह उपस्थित वराती मंडळी ने भोजनाचा आस्वाद घेऊन आदिवासी नवविवाहित जोडप्याच्या विवाह सोहळा आंनद उत्सवाने पार पाडला त्याकरिता शाळेचे  सुरज सर राजेन्द्र सर पराग  विशालसर नीलेश सर विलास सर किशोर सर सुभाष पाईकराव कीसन सोनोने  सह माजी विद्यार्थी व गावकऱयांनी अथक परिश्रम घेतले.

* सामाजिक उप्रकम म्हणून बुद्ध पौर्णिमेला संस्थेच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा कन्यादान योजना चे आयोजन करण्यात आले होते त्याचप्रमाणे यांनतर दरवर्षी बुद्धपोर्णिमेला संस्थेच्या वतीने विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येईल त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा
प्राचार्य संजय लायदे

* आमच्या संस्थेचे अध्यक्ष भाऊसाहेब भोगे यांनी मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या प्रगती करिता अनेकदा सामाजिक कार्य केले यांनतर ही संस्थेच्या स्व खर्चाने विवाह सोहळ्याचे दरवर्षी आयोजन करण्यात येणार आहे
डॉ देवेन्द्र भोंगाडे, संचालक, अंत्योदय मिशन देवग्राम

    Post Views:  500


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व