साथ सेवक फाउंडेशनचे आयोजन; शिवकाळ ते संविधान जागर विचारांचा!


छत्रपती करंडक : ७ डिसेंबरला राज्यस्तरीय खुली-आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा
 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  05 Dec 2022, 8:48 AM
   

अकोला - साथ सेवक फाउंडेशनच्या वतीने येत्या ७ डिसेंबर रोजी छत्रपती करंडक ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा भरविण्यात येणार आहे. मानाच्या फिरत्या करंडकचा यंदाचा मानकरी कोण होणार, याकडे सर्वांच्या नजरा असून स्पर्धेसाठी नाव नोंदणी सुरू झाल्याची माहिती आयोजकांकडून एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे देण्यात आली आहे.
छत्रपतींच्या स्वराज्यात रयतेला अभिव्यक्त होण्याचे स्वातंत्र होते. त्यामुळेच स्वराज्य निर्मितीसाठी रयतेने बहुमोल असे योगदान दिले. त्याच विचारांची कास धरुन समाजातील महत्वाच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी व महाराष्ट्रातील बुलंद विचारांना मुक्त व्यासपीठ निर्माण करुन देण्यासाठी शेतकर्‍यांना समर्पित छत्रपती करंडक ही वक्तृत्व स्पर्धा भरविण्यात येते. साथ सेवक फाउंडेशन या सामाजिक कार्यात अग्रेसर असणार्‍या संस्थेकडून छत्रपती करंडक या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन २०२१ पासून करण्यात येत आहे. यंदाही राज्यस्तरीय खुली आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा बुधवार (दि.७) डिसेंबर रोजी होणार आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ठाकरे सभागृह येथे स्पर्धा घेण्यात येणार आहे. आयोजकांकडून स्पर्धकासाठी दोन वेळ चहा व दुपारच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. नाव नोंदणीसाठी ७४९९२९५४७४, ८६०५७३०५२७ या मोबाईल क्रमांकावर संपर्क करण्याचे सांगण्यात आले आहे.

असे असतील स्पर्धेचे नियम 
सादरीकरणासाठी वेळ ५+१=६ मिनिटे, स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क २०० रूपये, छत्रपती करंडकचा मानकरी हा फक्त महाविद्यालयीन विद्यार्थी असेल त्यासाठी प्राचार्यांच्या सहीचे पत्र व ओळखपत्र बंधनकारक असेल, फक्त पूर्व नोंदणी करणार्‍या स्पर्धकांना प्रवेश, परीक्षकांचा निर्णय अंतिम व बंधनकारक.
------------
चौकट

स्पर्धेसाठी पारितोषिके-
- छत्रपती करंडक विजेता - मानाचा १२ किलो तांब्याचा छत्रपती करंडक (११,१११ रोख), मानाचा फेटा व मानाचा खलिता
- प्रथम क्रमांक - ७००१ रोख, प्रमाणपत्र
- द्वितीय क्रमांक - ५००१ रोख, प्रमाणपत्र
- तृतीय क्रमांक - ३००१ रोख, प्रमाणपत्र
- चतुर्थ क्रमांक - २००१ रोख, प्रमाणपत्र
- पंचम क्रमांक - १००१ रोख, प्रमाणपत्र, 
- उत्तेजनार्थ २ - ५०१ रोख, प्रमाणपत्र, 

हे असतील स्पर्धेचे विषय
काळाच्या भाळावर उमटलेली तेजस्वी मुद्राःछत्रपती, लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज, रक्षा तुझी नि माझी हे संविधान करते, प्रसार माध्यमे - आवाज कुणाचा?, हल्ली किसान होणे आसान काम नाही, आमच्या भुकेला धर्मच नसतो, धर्म दिल्लीत खतर्‍यात असतो, सूनो द्रोपदी शस्त्र उठालो, अब गोविंद ना आयेंगे, काय ती शाळा? 
काय ते शिक्षण? काय ते शिक्षक? सगळं काही ओके, जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे!

    Post Views:  211


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व