महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या अध्यक्षपदी सुरेश रणदिवे तर कार्यवाहपदी विष्णू मोरे यांची निवड
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
07 Aug 2023, 1:49 PM
नू.म.वी. प्रशाला पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद पुणे महानगर तर्फे घेण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या अध्यक्षपदी डॉ. दादा गुजर माध्यमिक विद्यालय प्रशालेचे क्रीडा शिक्षक सुरेश रणदिवे यांची तर विद्यापीठ हायस्कूलचे मुख्याध्यापक विष्णू मोरे यांची कार्यवाह पदी बिनविरोध निवड करण्यात आली. कार्याध्यक्षपदी ज्योत्स्ना सरदेशपांडे, नंदू रणधीर, कोषाध्यक्षपदी संगीता खेर , उपाध्यक्षपदी ज्योती मानकर, रोहिणी काळे , सहकार्यवाह पदी स्वप्निल सांगडे, विजय गोरे, महिला आघाडी प्रमुख पदी प्राची गुमास्ते, संघटन मंत्री पदी हनुमंत भांडवलकर, कार्यालय मंत्री पदी रेश्मा दीक्षित तर कार्यकारणी सदस्य म्हणून निवृत्ती गोपाळे, सतीश केंगार, हेमंत निकुंभ, राहुल गवते, सचिन पुरी, अर्चना शेडगे, स्वाती सातपुते, शंकर बांगर, सुनील कदम यांची निवड करण्यात आली.
Post Views: 426