केन्द्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रात प्रथम आल्याबद्दल डॉ.कश्मिरा संखे यांचा सत्कार
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
24 Jun 2023, 6:23 PM
बोईसर -( संतोष घरत) - केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून जाहीर झालेल्या नागरी सेवा परीक्षा २०२२ (UPSC) परीक्षेत डॉ. कश्मिरा संखे ही राज्यात पहिली तर देशात २५ वा क्रमांक मिळविला आहे. दातांची डॉक्टर (डेंटिस्ट)असलेली कश्मिरा संखे ही ठाण्यात, श्रीनगर भागात राहत असून तिचे मूळ गाव एकलारे ,पालघर आहे. ती किशोर संखे ह्यांची सुकन्या आहे.
विशेष म्हणजे वंजारी समाजात प्रशासकीय सेवा ( IAS) होणाऱ्या डॉ. कश्मिरा संखे ह्या पहिल्याच महिला आहेत. डॉ. कश्मिरा संखे हिने आपल्या यशाचे संपूर्ण श्रेय आपल्या आई-वडिलांना दिले आहे. कश्मिराने नेत्रदीपक यश संपादन करून भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल तिचे सर्व स्तरावरून कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होताना दिसत आहे.
डॉ्. कश्मिरा संखे हिने मिळवलेल्या यशाचा सन्मान करण्यासाठी भव्य नागरी सत्कार सोहळा पालघर जिल्हा वंजारी समाज हितवर्धन मंडळातर्फे २९ जून २०२३ रोजी दुपारी ४:३० वा. स्व. किशोर गंगाधर संखे व मोरेश्वर वामन पाटील खुले सभागृह अमेय पार्क ,नवापूर रोड बोईसर (पश्चिम) येथे पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केला असून ह्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे .
ह्या कार्यक्रमा करिता समाजातील व पंचक्रोशीतील इतर समाज बंधू भगिनीने व युवकाने मोठ्या संख्येने समारंभास उपस्थित राहून समारंभाची शोभा वाढविण्यास सहकार्य करावे अशी विनंती पालघर जिल्हा वंजारी समाज हितवर्धक मंडळाचे अध्यक्ष नरोत्तम पाटील ,उपाध्यक्ष निलम संखे व समस्त कमिटीच्या पदाधिकारीनी केली आहे.
Post Views: 172