नटवरलालच्या निर्माणाधीन इमारतीचा स्लॅप कोसळून ३ कामगार गंभीर जखमी,नटवरलाल अजून किती जणांचे बळी घेणार?


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  01 Mar 2023, 8:58 AM
   

बोईसर: (संतोष घरत)- दि. २८फेब्र रोजी, सालवड ग्राम पंचायत हद्दीतील व तारापूर एमआयडीसीच्या अखत्यारित असलेल्या महाडा कॉलनी लगत असलेल्या प्लॉट नंबर पी – १६४ / १६५ वर व्यावासायिक इमारतीचे बांधकाम सुरू आहे. आज दुपारी ३:०० वाजताच्या सुमारास जवळपास १५ कामगारांसह स्लाप टाकण्याचे काम सुरू असताना निकृष्ट दर्जाचे साहित्य वारल्याने आचानक स्लाप कोसळला यात तीन जन जखमी झाल्याची प्राथमिक महिती समोर आली आहे.
दरम्यान या इमारतीचा स्लॅप टाकण्याचे काम सुरू असताना वास्तु अभियंता, सुरक्षा अधिकारी या पैकी कोणीही नसल्याचे व नियुक्ती करण्यात आली नसल्याचे समजते तर कामगारांना सुरक्षा साधने देण्यात आली नव्हती. या सर्व कामगारांची इमारत व इतर बांधकाम महामंडळात नोंदणी करण्यात आली नसल्याचे समजते.
  बांधकाम व्यवसायाचे कोणतेही ज्ञान नसताना व सुरक्षा साधने, सुरक्षा व्यवस्था व नियोजन शून्यतः अशा अनेक तृटी व अज्ञानता असताना ही वारंवार मोठ मोठ्या इमारतींचे बांधकाम करण्याच्या नटवरलाल यांच्या लालची सवयीमुळे झालेल्या दुर्घटनेत जवळपास १५ कामगारांचे प्राण सुदैवाने वाचले आहेत.
  जानेवारी २०२० मध्ये याच नटवरलाल उर्फ नटूभाई पटेल यांच्या ए.एन. के.फार्मा प्लॉट नं. एम – २, कंपनीच्या निर्माणाधीन कंपनीच्या इमारतीत केमीकलचे उत्पादन सुरु असताना झालेल्या भिषण स्फोटात ८ जणांचा मृत्यू तर ७ गंभीर जखमी झाले होते. मृतांच्या नातेवाईका वारसांना अजून ही नुकसान भरपाई देण्यात आली नाही.
   तर बेकायदेशीर इमारत बांधकाम व केमिकलचे उत्पादन घेण्याच्या लालची सवयीमुळे स्वतःचा जीव धोक्यात घालून ८ जणांचा बळी घेणाऱ्या नटवरलाल वर कारवाई करण्यात येईल का ते पहावे लागेल.

    Post Views:  173


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व