देवेंद्र मेश्राम यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार
पर्यावरण मित्र बहूध्देशीय सामाजिक संस्थेकडून अभिनेत्री सौ.नयना आपटे यांचे हस्ते पुरस्कार वितरण
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
20 Aug 2024, 11:44 AM
(देवेंद्र मेश्राम) बोईसर - सामाजिक कार्यकर्ता देवेंद्र शिवचरण मेश्राम यांना राज्यस्तरीय समाज भूषण पुरस्कार 2024 ने सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री नयना आपटे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पर्यावरण मित्र बहुउद्देशीय सामाजिक संस्था भारत या संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2024 चे आयोजन ठाणे जिल्ह्यातील वाशिंद येथे न्यू आयडियल स्कूल वाशिंद येथे 18 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री नयना आपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमात संस्थेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष विजय चोघळा सर तसेच संस्थेचे सन्माननीय पदाधिकारी यांचे सुंदर असे कार्यक्रमाचे सुंदर असे नियोजन आणि अनेक सन्माननीय प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला.या वेळी संपूर्ण महाराष्ट्रातील अनेक शेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या जवळ पास 70 ते 80 राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण करण्यात आले.त्यात पर्यावरण मित्र,समाज भूषण,आरोग्य दूत,शिक्षक असे अनेक पुरस्काराने गौरविण्यात आले.कार्यक्रमात संस्थेचे पदाधिकारी आणि कार्यक्रमात सहभागी झालेले प्रमुख पाहुणे आपल्या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे रांगोळी सेटअप जो विलास शेलार यांनी केला होता. सदरचा सोहळा हा संपन्न करण्यासाठी सर्वांनी मोलाचे योगदान दिले यामध्ये श्री राजेंद्र पाटील साहेब, श्री अरुण पाटील साहेब, श्री अरुण भोईर, श्री संदीप म्हसकर सर, विजय चौघला सर, सौ संगीता भरे मॅडम, श्री प्रदीप चव्हाण सर, दिनेश चौधरी सर, प्रशांत जाधव सर, सचिन धामणे सर, श्री संजय तारमळे,श्री कळसकर सर, सुरेश चव्हाण सर, श्री नामदेव भोईर सर, श्री रोहिदास चौधरी सर, श्री जगदीश चव्हाण सर,श्री रुपेश बोराडे सर, श्री रुपेश पितांबरे, युवराज तीवरे, सर, श्री भगवान तारमळे, श्री नंदू दिवाने सर, सौ प्रतीक्षा बोर्डे मॅडम, सौ प्रीती पवार मॅडम, सौ प्रगती जाधव मॅडम, सुवर्णा वेखंडे मॅडम, सुनील पाटील सर, जयवंत विशे सर, श्री संजय जाधव सर, श्री रवींद्र पवार सर, श्री संजय लोंढे सर, मिलिंद सुलताने सर, दौलत चव्हाण सर, तसेच त्यांचा लेझीम पथक, न्यू आयडल स्कूल स्टाफ, शारदा इंग्लिश मीडियम स्टाफ, साऊंड सर्विस दानबाव, खडवली रोहित व्यापारी, विरार वरून आलेले मामा, आणि सर्व पदाधिकारी या सर्वांनी आपला कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचं सहकार्य केलेले आहे.कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन संस्थेचे सन्माननीय संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष विजय चोघला सरांनी केले. पुरस्काप्राप्त सामाजिक कार्यकर्ता आणि पर्यावरण मित्र बहुउद्देशीय सामाजिक संस्थेचे पालघर जिल्हा संघटक देवेंद्र मेश्राम यांनी आपल्या संस्थे चे सन्माननीय पदाधिकारी यांचे आभार मानले.
Post Views: 161