स्वातंत्र्य सेनानी गोपाळराव देशमुख यांच्या कार्यपुस्तिकेचे प्रकाशन
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
15 Sep 2022, 7:36 PM
उगवा येथील थोर स पुस्तक लिहून पुस्तक प्रकाशनाचा स्वातंर्य सेनानी सामाजिक कनेते स्व.गोपाळराव देशमुख यांच्या जीवनकार्याचा परिचय देणाऱ्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नुकताच उगवा येथे संपन्न झाला.
स्वर्गीय देवरावजी पटोकार भवन उगवा,ता.जि.अकोला येथे झालेल्या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी श्री विलासरावजी मुंजे होते . कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून ह.भ.प श्रीकृष्ण महाराज मुरकर, निर्माण ग्रूपचे अध्यक्ष गणेशरावजी देशमुख, गोट बँकेचे अध्यक्ष नरेशरावजी देशमुख, अकोला जिल्हा बार असोसिएशन तथा उमरीतील टिळक राष्ट्रीय सरस्वती मंदिराचे माजी अध्यक्ष साखरकार, हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
यावेळी अध्यक्ष आणि प्रमुख अतिथी यांचेसह स्थानिक सरपंच गजानन बाहाकर, पोलीस पाटील गजाननराव पारधी, तंटामुक्ती अध्यक्ष प्राध्यापक रामदासजी शिरसाट, गोट बँक तथा निर्माण चे सल्लागार शरदराव देशमुख मा. गटविकास अधिकारी समाधानजी जगताप, मा. पणन महासंघाचे झोनल मॅनेजर आर. एस. देशमुख,मा. बाल विकास अधिकारी लक्ष्मणराव पद्मने, मा. सेल टॅक्स चे ॲडिशनल कमिशनर मुंबईचे अरुणराव देशमुख, भारत विद्यालय पंचगव्हाण चे अध्यक्ष संजय राव देशमुख, पुस्तकाचे लेखक विजय बाहाकर ,मा. एम.आय.डी.सी चे विभागीय अध्यक्ष ठाकरे साहेब,मा. एमआयडीसी अकोला चे एक्झिक्युट इंजिनिअर संजयराव देशमुख, उद्योजक बाळासाहेब देशमुख चित्रकार सुभाषराव देशमुख मा. इंडियन बँक चे मॅनेजर नामदेव शिरसाट , ग्रामीण ग्रामविकास जेष्ठ महिला नागरिक सेवा संघाच्या मेघाताई पटेल, स्वातंत्र्यसेनानी गोपाळराव देशमुख यांच्या सुकन्या रजनीताई देशमुख, भैय्यासाहेब देशमुख
स्वातंत्र्य सेनानी गोपाळराव देशमुख यांचे वारसदार यशवंतराव उर्फ बंडू नाना गो.देशमुख मा.मुख्याध्यापक,मा. उपमहाव्यवस्थापक महाबीज अकोला चे केशवराव गो. देशमुख, मा. सह दुय्यम निबंधक अकोला चे माधवराव गो. देशमुख आदी ३० मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्य सेनानी चे वारसदार राजेंद्र प्रिंटर्स चे श्री राजेंद्रजी देशमुख, पञकार श्री दांदळे, चंद्रकांत सावजी, देशमुख साहेब यांनी कार्यक्रमाला हजेरी लावली होती.
पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त स्वर्गीय गोपाळराव देशमुख यांच्या इच्छेनुसार भारत माता स्वतंत्र होण्यासाठी ज्यांनी ज्यांनी बलिदान दिलं तुरुंगवास भोगला ,हाल अपेष्टा सहन करून मरणयातना भोगल्या, त्या क्रांतिवीरांना स्मरण करून त्यांच्या कुटुंबीयाप्रती आदरभाव ठेवावा म्हणून व्यासपीठावर उपस्थित असलेले उगव्यातील नररत्ने स्वातंत्र्य सेनानी रतनलालजी पटेल यांचे वारसदार ईश्वरलाल पटेल, स्वा.से. रामभाऊ जोशी यांचे वारसदार श्री जोशी, स्वा. से. काशिनाथ उर्फ किसनलाल पटेल यांचे वारसदार राहूल पटेल स्वा.से विश्वनाथ आप्पा घरे यांचे वारसदार अशोकराव एक घरे, स्वा. से. डॉक्टर रा.मा .केने यांचे वारसदार गणेशराव केने, स्वा.से मारुती जानोजी शिरसाठ यांचे वारसदार विजयराव शिरसाठ, माणिकचंद पटेल यांचे वारसदार रमेश जी पटेल, आबासाहेब देशमुख (सातेगांवकर) यांचे वारसदार दिलीपराव देशमुख,वाडे गावचे मानकर, यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शाल, पुस्तक,मेमेंटो (सन्मानचिन्ह) बुके देऊन त्यांना गौरव करण्यात आला.प्रमुख वक्ते निर्माण ग्रुपचे गणेश रावजी देशमुख,अभययराव तायडे, कार्यक्रमाचे उद्घाटक ह भ प श्रीकृष्ण महाराज मूरकर कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी विलासरावजी मुंजे , पुस्तकाचे लेखक विजय बाहाकर यांनी स्वर्गीय गोपाळ देशमुख आणि उगवा गावातील स्वातंत्र्यसेनानी यांच्या जीवनावर प्रकाश टाकला.
स्वातंत्र्यपूर्व काळात १९४३ साली गोपाळ रावांनी आपल्या वाड्यात एक महिन्याचे भूमिगत शिबिर घेतल्याची इतिहासात नोंद आहे.प्रातिय नेते नागपूरचे एन एल राव शंकररावजी गेडाम शासकीय लोकरीचे राजीनामा देऊन देशाच्या देशाच्या क्रांती लढ्यात सामील झालेले आर के पाटील यांनी मार्गदर्शन केल्याची नोंद आहे. तसेच अभिनेत्री स्मिता पाटील यांचे वडील शिवाजीराव पाटील हे सुद्धा एक महिना या वाड्यात भूमिगत होते. प्रतापराव भोसले यांनी सुद्धा या वाड्यात मुक्काम केल्याची नोंद असल्याचे घटनाक्रम यावेळी वक्त्यांनी भाषणातून उपस्थितांसमोर ठेवले. गोपाळराव यांचा जन्म बालपण ,शिक्षण , आदी चा उल्लेख वक्त्यांनी केला.
स्वातंत्र सेनानी मारोतराव सावजी यांनी गोपाळरावांना मुंबईहून आमदारकीचे तिकीट सुद्धा आणले होते. गोपाळराव काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष ग्राम उद्योग समितीचे अध्यक्ष, हरिचंद्र संघाचे अध्यक्ष होते. तसेच त्यांनी अनेक संस्था स्थापन केल्या. ग्रामीण विकास मंत्री आबासाहेब खेडकर यांच्यामार्फत गावात वीज आणि दोन किलोमीटर वरून पाइपलाइन ने पाणी आणून गावासाठी पिण्याच्या पाण्याची सोय केली होती.
यानिमित्त ग्रामविकास जेष्ठ नागरिक पुरुष व महिला सेवा संघाच्या वतीने श्रीमद् भागवत सप्ताह आयोजित केला होता.ह भ प श्रीकृष्ण महाराज मूरकर श्रीमद् भागवताचे वाचन गावकऱ्यांना मंत्रमुग्ध केले. भागवताची सांगता आणि पुस्तक प्रकाशन सोहळा यशस्वी होण्याकरिता ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे सर्वश्री के.जी .देशमुख, रामदास तराळे, धोंडोपंत ठाकरे, प्राध्यापक रामदासजी शिरसाट, हेमंत पटेल, पुंडलिकराव शिरसाट, रमणलालजी पटेल, विलासराव देशमुख ,प्रकाश अटकर, महादेव कापसे, किसन गहले नाजूकराव देशमुख प्रल्हाद कावरे श्रीराम आगरकर महिला सेवा संघाचे अध्यक्षा मेघाताई पाटील उपाध्यक्षा विजयाताई दांदळे, विजय बाहाकर, नामदेवराव कोरडे ,बाळूभाऊ केने आणि त्यांचे भजनी मंडळ,गणेश पारस्कर हनुमान मंडळाचे सर्व कार्यकर्त्यांनी आठ दिवस सतत मेहनत घेतली. स्वातंत्र्य सेनानी गोपाळराव देशमुखपुस्तक प्रकाशन सोहळा चे प्रास्ताविक श्री केजी देशमुख यांनी केले तर आभार कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन श्री रामहरी अघडते यांनी केले. असे प्रसिद्धीप्रमुख रामहरी अघडते व विजय बाहाकर यांनी कळविले आहे.
Post Views: 238