तारापूर औद्योगिक वसाहतिचा नक्कीच भोपाळ होणार हया मध्ये तीळ मात्र शंका नाही


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  05 Jul 2023, 10:11 AM
   

बोईसर:- औद्योगिक क्षेत्रात दिवसेंदिवस  कंपनीमध्ये स्फोटांचे प्रमाण वाढत असून त्याला कारणीभूत संबंधित विभागाचे अधिकारीच आहेत अशी सर्वत्र कुजबुज सुरू आहे.
   तारापूर औद्योगिक क्षेत्रातील प्लॉट नंबर W-196 असलेल्या गोडाऊनला सोमवारी रात्री 9:30 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत तीन जण होरपळल्याची माहिती मिळाली असून त्यांना बोईसर येथील तुंगा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बोईसर तारापूर औद्योगिक क्षेत्रातील रविना इंडस्ट्रीज च्या पाठीमागे असलेल्या प्लॉट नंबर W-196 असलेल्या एका गोडाऊनला सोमवारी रात्री 9:30 मिनिटांच्या सुमारास भीषण आग लागली. आग  भयंकर होती की आगीच्या ज्वाला दूरपर्यंत दिसत होत्या. ज्वलंतशील रसायनाच्या टँकर ला ही आग लागली, आणि बघता- बघता सर्व गोडवून जळून नष्ट झाल्याची घटना घडली आहे. या आगीत 1). फुरखान युनिस खान वय वर्ष 26 रा. हरदावली, तालुका बबेरू, जिल्हा बांदा उत्तर प्रदेश सध्या राहणार सत्तर बंगला एमआयडीसी बोईसर 2)अस्पाक नजर मोहम्मद शेख वय. 35 वर्ष मूळ रा. दलपुतपुर ,तालुका जिल्हा बलरामपुर उत्तर प्रदेश. सध्या राहणार सत्तर बंगला एमआयडीसी बोईसर. आणि 3)काळुराम संतराम वर्मा वय वर्ष 50 रा. सत्तर बंगला ,एमआयडीसी बोईसर. अशी तिघा जखमींचे नावे आहेत. त्यांना तूंगा रुग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले आहे. तत्काळ घटनास्थळी अग्निशमन दलाचे चार गाड्या पोहचल्या आणि अग्निशमन
दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करत रात्री उशिरापर्यंत आग आटोक्यात आणली. सदर गोडाऊन मध्ये मोठ्या प्रमाणात ज्वलनशील रसायन साठवून ठेवल्यामुळे ते रसायन आग लागल्यानंतर गटारी पर्यंत पोहोचल्याने गटारीत देखील लांबपर्यंत आग पसरली परंतु अग्निशमनाच्या जवानांनी ती आग विझवण्यात यश मिळवले. आग आटोक्यात आली नसती तर  आजूबाजूला असणाऱ्या कारखाने देखील आगीच्या भक्ष्यस्थानी गेली असती. याचे कारण गोडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात ज्वलंतशील रसायन साठवले गेल्याने ही आग गटारीत रसायन गेल्याने पसरत होती.
  घटना स्थळी बोईसर पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक श्री. उमेश पाटील आणि त्यांचे सर्वच सहकारी तात्काळ दाखल झाले. काही वेळात त्याठिकाणी विभागीय पोलिस अधीक्षक संजय शिरसाट, उपविभागीय अधिकारी सुनील माळी, एमआयडीसी उपअभियंता लांजेवार, आणि मंडळ अधिकारी मनीष वर्तक देखील हजर झाले.
मिळालेल्या माहितीनुसार या सत्तर बंगला परिसरात प्लॉट नंबर डब्ल्यू मध्ये मोठ्या प्रमाणात चोरीचे रसायन गोडावून मध्ये साठवले जाते. त्यातून मोठ्या प्रमाणात हेराफेरी केली जाते. आणि त्यातून अशाप्रकारच्या घटना पाहण्यास मिळतात. परंतु याकडे एमआयडीसी चे अधिकारी आणि स्थानिक पोलीस प्रशासन यांचे नेहमीच दुर्लक्ष असल्याचे आढळून येते.
आग लागण्याचे कारण म्हणजे ज्वलंत शील रसायनाच्या टँकरचे चालक आणि त्याच्या सहकारी यांनी जेवण बनविण्यासाठी स्टो पेटवल्याने भडका उडून केमिकल टँकरला आग लागली. आणि त्या आगीत तीन जण होरपळले. अशी माहिती समोर आली आहे.

    Post Views:  231


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व