सी. ए. टी. सी. ११४ कॅम्प मध्ये एल. आर. टि च्या एन. सी. सी. यूनिटला २४ मेडल


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  17 Oct 2022, 12:56 PM
   

पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे ११ महाराष्ट्र एन. सी. सी. बटालियन अकोला अंतर्गत दि. ४ ऑक्टोबर  ते ११ ऑक्टोबर,२०२२ पर्यंत सी. ए. टी. सी. कॅम्प ११४ चे आयोजन करण्यात आले होते. ११ महाराष्ट्र बटालियनचे एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला यांच्या नेतृत्वामध्ये या कॅम्प मध्ये श्रीमती एल. आर. टि. कॉलेज अकोला, पी. डी. के. व्ही. अकोला, हाॅली क्रॉस अकोला, भारत विद्यालय अकोला, एम. इ. एस. हायस्कूल मेहकर, शिवाजी हायस्कूल मेहकर, मूर्तिजापूर हाईस्कूल मूर्तिजापूर, विद्या मंदिर विद्यालय अकोला व ज्योति जानोरकर विद्यालय अकोला यांचे एकूण ३१६ एन. सी. सी. कॅडेट्सनी सहभाग घेतला होता. ०८ दिवस चाललेल्या या कॅम्प दरम्यान कॅडेटला नेतृत्व, एबट्रेकल, फायरिंग तसेच त्यांच्या कलागुणांना चालना विविध प्रकारच्या जबाबदाऱ्या कॅडेट्सला देण्यात आल्या. यामध्ये श्रीमती एल. आर. टी. वाणिज्य महाविद्यालय, अकोला येथील एन. सी. सी. यूनिटच्या कॅडेट्सनी प्रत्येक उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन उत्तम रित्या प्रदर्शन करून २४ मेडल प्राप्त केले. यामध्ये सीनियर अंडर ऑफिसर रोहित डिगे याला कॅम्प सीनियर साठी गोल्ड मेडल, जूनियर अंडर ऑफिसर श्याम ढोरे याला कॅम्प आर. पी. साठी गोल्ड मेडल, जूनियर अंडर ऑफिसर मिनल रेड्डी हिला बटालियन कॅडेट अॅडज्युडंट साठी गोल्ड मेडल, सार्जंट जयश्री हरसुलकर हिला कंपनी सीनियर साठी गोल्ड मेडल, सार्जंट ऋषिकेश पटेल याला कंपनी सीनियर साठी गोल्ड मेडल, सी. पी. एल. शिवानी अवातिरक हिला वेपन ट्रेनिंग मध्ये गोल्ड मेडल, सी. पी. एल. प्राजक्ता नारखेडे हिला बेस्ट कॅडेट साठी गोल्ड मेडल, सी. पी. एल. कार्तिक लाडगे तसेच सी. पी. एल. सागर वानखेड़े याला सपोर्टिंग वालंटियर साठी गोल्ड मेडल, सी. पी. एल. ओम हिरनवाडे याला बेस्ट वालंटियर साठी गोल्ड मेडल, सी. पी. एल. वैष्णवी ढेंमरे तसेच कॅडेट वैष्णवी पांडे हिला रंगोली स्पर्धा मध्ये गोल्ड मेडल, कॅडेट साक्षी पांडे हिला मॅप रिडिंग साठी गोल्ड मेडल, कॅडेट पुर्वा देवघरे हिला फायरिंग मध्ये गोल्ड मेडल, कॅडेट अरविंद कुमार यादव याला बेस्ट कॅडेट साठी गोल्ड मेडल, कॅडेट शिवम देशमुख याला मॅप रिडिंग मध्ये गोल्ड मेडल, कॅडेट सूरज मुरूमकार याला फायरिंग मध्ये गोल्ड मेडल, कॅडेट ऋषिकेश शेलार याला बेस्ट इन ड्रिल साठि गोल्ड मेडल, कॅडेट रेशमा गालफाडे हिला बेस्ट इन ड्रिल मध्ये गोल्ड मेडल, कॅडेट साक्षी ठाकरे हिला वेपन ट्रेनिंग साठी गोल्ड मेडल, कॅडेट प्रणव इंगोले याला बेस्ट वालंटियर साठी गोल्ड मेडल, कॅडेट हर्शल पाल याला सपोर्टिंग वालंटियर साठि गोल्ड मेडल, कॅडेट सलोनी यादव तसेच कॅडेट तेजस डांगे याला बेस्ट कॅम्प अनुभव यासाठी गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले. या संपूर्ण कॅडेटल कॅम्प कमांडर यांच्या हस्ते मेडल देऊन सन्मानीत केले गेले.  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीप्रभू चापके, आई. क्यू. ए. सी. समन्वयक डॉ. योगेश अग्रवाल व एन. सी. सी. ऑफीसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांनी कॅडेट्सनी मिळवलेल्या यशाबद्दल तसेच महाविद्यालयाच्या नावलौकिकात भर पाडल्याबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला. कॅडेटच्या या कामगिरी बद्दल दि. बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंहजी मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष श्री. विजयकुमारजी तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष श्री. रवींद्रजी जैन, मानद सचिव श्री. पवनजी माहेश्वरी, सहाय्यक सचिव इंजि. अभिजितजी परांजपे व समस्त माननीय कार्यकारी सदस्यांनी एन. सी. सी. कॅडेट्सचे अभिनंदन केले आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

    Post Views:  138


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व