मुख्यमंत्री घाबरलेल्या अवस्थेत बोलत होते, अजिबात भाषणात दम नव्हता- चंद्रकांत खैरे


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  13 Sep 2022, 12:40 PM
   

औरंगाबाद : काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठणमध्ये सभा झाली. यासभेवर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी टीका केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेला 300 रुपये आणि 500 रुपये देऊन लोक आणले होते, असा दावा खैरेंनी काल सभेवेळी केला होता. त्यानंतर त्यांनी पु्न्हा एकदा अशीच टीका केली आहे. एकनाथ शिंदे हेच गलिच्छ राजकारण करतात, त्यांनी उपकारांची जाणिव ठेवली नाही, असं खैरे म्हणालेत. मुख्यमंत्री घाबरलेल्या अवस्थेत बोलत होते. त्यांच्या भाषणात अजिबात दम नव्हता, असं म्हणत त्यांनी टीका केली आहे.

    Post Views:  188


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व