पुणे - महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थांतर्गत ऊर्जा क्रीडा स्पर्धेच्या नियोजना संदर्भात सभेचे आयोजन आयोजक शाळा विद्यापीठ हायस्कूल तर्फे रमा पुरुषोत्तम संकुल (महिलाश्रम प्रशाला) येथे करण्यात आले. योगासन, बुद्धिबळ, सूर्यनमस्कार, जलतरण, चित्रकला व समूह गान स्पर्धेचे आयोजन प्रथम सत्रात तर द्वितीय सत्र मध्ये मैदानी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
विविध समित्या, स्पर्धेची नियमावली, स्पर्धेचे स्थळ,तारीख,... इ. चर्चा करण्यात आली. महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष रवींद्रजी देव, व्यवस्थापक मंडळ सदस्य व क्रीडा समिती प्रमुख किरण बराटे यांनी मार्गदर्शन केले. विद्यापीठ हायस्कूल शाळा समिती अध्यक्ष सीमा कांबळे, कामशेत, वाई, सातारा, पुणे येथील पूर्व प्राथमिक ,प्राथमिक, माध्यमिक प्रशालेतील मुख्याध्यापक, क्रीडा शिक्षक, चित्रकला शिक्षक उपस्थित होते. रमेश तळेकर व अनघा चिकटे यांचा सत्कार करण्यात आला.सभेचे प्रास्ताविक विष्णू मोरे यांनी तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोहर निकम यांनी केले.
Post Views: 267