तब्बल 205.6 किलो हेरॉईनसह 394 मेट्रिक टन जिप्सम पावडरही जप्त!


गुजरातमध्ये पुन्हा अवाढव्य अंमलीसाठा हस्तगत
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  25 Apr 2022, 11:41 AM
   

नवी दिल्ली : गुजरातमध्ये एका बंदरावर पुन्हा एकदा अतिप्रचंड प्रमाणात अंमली पदार्थांचा साठा आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली. गुजरात कांडला बंदरावर अंमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. तब्बल 350 किलो हेरॉईन जप्त करण्यात आलं आहे. कांडला बंदाराच्या गोदामात गुजरात एटीएस आणि डीआरआयनं केलेल्या कारवाईत अंमली पदार्थांच्या मोठ्या साठ्यावर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. जवळपसा दोन हजार कोटी रुपयांचा हा साठा असल्याचा संशयही व्यक्त केला जातोय. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार केंद्रीय अर्थमंत्रालयानं या कारवाईत जप्त करण्यात आलेल्या साठ्याची आकडेवारीही जारी केली आहे. बुधवारी (20 एप्रिल) तर गुरुवारी (21 एप्रिल) रोजी मोठी कारवाई कांजला बंदरावर करण्यात आली होती.

या कारवाईदरम्यान, 17 कंटेनरमधून 10 हजार 318 जिप्समच्या गोण्या आणण्यात आल्या होत्या. त्यातून 3 लाख 94 हजार 400 किलो वजनाचा अंमली साठा जप्त करण्यात आलाय. या अंमली पदार्थाची वाहतूक उत्तराखंडच्या पांडरी सिसोनामधील बालाजी ट्रेडर्स कंपनीनं या मालाची वाहतूक इराणहून भारतात केली होती, अशी माहिती अमर उजालानं दिली आहे. इराणच्या अब्बास बंदरातून हा अंमली पदार्थांचा साठा आणण्यात आला होता.

काय काय आढळलं?

इराणहून कांडला बंदरात आलेल्या 17 कंटेनरमध्ये खळबळजनक बाबी आढळून आल्या आहेत. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं याबाबतची धक्कादायक माहिती दिली आहे. इराणहून आलेल्या कांडला बंदरात तब्बल 205.6 किलो हेरॉईन जप्त असल्याचं समोर आलंय. याची किंमत अवैध बाजारात जवळपास 1 हजार 439 कोटी इतकं असल्याचं सांगितलं जातंय. तर 394 मेट्रीक टन जिम्पस पावडर आढळून आलीय.

    Post Views:  214


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व