अकोल्याच्या दऊत लेखणीचे दिल्लीच्या साहित्य संमेलनात डॉ. तारा भवाळकर यांचे हस्ते प्रकाशन


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  25 Feb 2025, 8:30 AM
   

अकोला - अकोला नगरीतून प्रकाशित होणाऱ्या विजय देशमुख संपादित दऊत लेखणी  या तिमाही मासिकाच्या साहित्य संमेलन विशेष अंकाचे प्रकाशन नवी दिल्ली येथे संपन्न झालेल्या अ. भा. साहित्य संमेलनात करण्यात आले. भारताचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी व राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष मा. शरद पवार प्रामुख्याने उपस्थित असलेल्या या संमेलनात संमेलनाच्या अध्यक्षा  डॉ. तारा भवाळकर यांचे हस्ते हे प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी डॉ. भवाळकर यांनी दऊत लेखणीच्या उपक्रमाचे कौतुक करून या अंकास शुभेच्छा दिल्या. या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी  साहित्य महामंडळाचे सदस्य तथा प्रभात किड्स चे संचालक  डॉ. गजानन नारे, पुणे येथील मदन बंब, सातारा येथील धनाजी खाडे, नवी मुंबईचे गजानन म्हात्रे, ठाण्याचे विजय जोशी प्रामुख्याने उपस्थित होते.
       महाराष्ट्र व महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा संपन्न झालेल्या प्रत्येक साहित्य संमेलनाचा विशेषांक तयार करून अध्यक्षांचे हस्ते प्रकाशन करण्याचा दऊत लेखणीचा पायंडा आहे. सुमारे 44 वर्षांपूर्वी 1981 साली सुरू करण्यात आलेल्या या मासिकाने आजवर विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडींचे सखोल माहिती असलेलें विशेषांक काढून संपूर्ण महाराष्ट्रात एक आगळावेगळा कौतुकास्पद उपक्रम सुरू केलेला आहे. आणि त्यांचा हा उपक्रम कुठलाही खंड न पडता अव्याहतपणे सुरू आहे हे विशेष. या दऊत लेखणीच्या निर्मितीसाठी विजय देशमुख यांचे सह अकोला नगरीतील त्यांचे सहकारी सेवानिवृत्त न्यायाधीश  शशिधर गोगरकर, साहित्य व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले ज्येष्ठ पत्रकार प्रदीप खाडे, प्रा. लक्ष्मीकांत देशमुख, प्रा. डॉ. दिलीप इंगोले, डॉ.  सुभाऊ ठोसर, निलेश पाकधुने, सूर्यकांत बुडखले, विनिता हिंगे ठोकळ, विजय सरदार, प्रा. डॉ. मोहन खडसे, प्रा. डॉ. मोहन गद्रे, प्रा. अरविंद देशमुख, किरण वाखारकर, वर्षा बाकरे पाटील, प्रा. डॉ. सुहास उगले, डॉ. विनय दांदळे, सुभाष सातव, श्रीकांत गोंधळेकर, गीता बाली उनवणे, प्रा. डॉ. निळकंठ इंगळे हे सर्व परिश्रम घेत आहेत.
       मराठी, हिंदी, इंग्रजी, उर्दू या बहुभाषांमध्ये प्रकाशित होणाऱ्या  दऊत लेखणीचा परिवार महाराष्ट्रातील प्रत्येक मोठ्या शहरासह इतरही राज्यात विखुरलेला आहे. या मासिकाचा मराठी विभाग  विजय दळवी, प्रा. सीमा रोठे, मनोज पाठक हे संभाळीत असून हिंदी विभाग प्रा. डॉ. रामप्रकाश वर्मा, मधु शुक्ला, प्रा. शारदा बियाणी हे सांभाळीत आहेत. इंग्रजी विभागाची जबाबदारी  प्रा. डॉ. श्रीकांत उखळकर, प्रा. डॉ. दीपक दामोदरे व उर्दू विभाग  डॉ. इकबाल मित्रे, दीपक मोहाळे , नदीम सर  हे सांभाळीत आहेत. भविष्यातही नागरिकांसह विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरतील असे वेगवेगळ्या विषयांवरील विशेषांक प्रकाशित करण्याचा आपला मनोदय आहे असे या मासिकाचे संपादक  प्रा. विजय देशमुख यांनी कळविले आहे.

    Post Views:  164


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व