सु. पुं. अढाऊकर लिखित शियान कादंबरीचे प्रकाशन 30 एप्रिल रोजी मुंबईत
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
30 Apr 2022, 11:44 AM
सुप्रसिद्ध वर्हाडी साहित्यिक श्री सु. पुं.अढाऊकर लिखित वऱ्हाडी भाषेतील उत्कृष्ट कादंबरी शियानचे प्रकाशन येत्या 30 एप्रिल 2022 रोजी सायंकाळी 5 ते 8 या वेळेत मुबई येथे होणार आहे. सु.पुं.अढाऊकर यांच्या बहुचर्चित शियान या वऱ्हाडी कादंबरीचे प्रकाशन मुंबई येथील गाडगेबाबा मिशन संस्था कुर्ला, मुंबई येथे जेष्ठ रंगकर्मी व लेखक अशोक महाजन, चंद्रशेखर परांजपे, यांच्या हस्ते श्री ज्ञानदेव कडूबाबा चौधरी, धीरज शिंदे, प्रकाश ज्ञानदेव चौधरी, संदीप साबळे, यशवंत भोजने, विकास चौधरी, प्रथमेश बागुल या मान्यवरांच्या उपस्थिती संपन्न होणार आहे.
साहित्यविश्व प्रकाशन, पुणे यांनी प्रकाशित केलेल्या शियान या कांदबरीला सुप्रसिद्ध साहित्यिक श्रीपाल सबनीस यांची प्रस्तावना असून डॉ.रावसाहेब काळे, विनय मिरासे व डॉ. राज यावलीकर यांचे अभिप्राय आहेत. श्री अढाऊकर यांचे या अगोदर चूल, भूक, भाकर हे काव्यसंग्रह व मुंबईच्या गोष्टी, वऱ्हाडीच्या कथा हे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. या कार्यक्रमाचे आयोजक संदीप साबळे हे असून सदर कार्यक्रमाला बहूसंख्येने उपस्थित राहण्याचे त्यांनी आवाहन केले आहे.
Post Views: 229