भाजपचा आपल्याला पाठिंबा; एकनाथ शिंदेंकडून गौप्यस्फोट


बंडखोर आमदारांना केले मार्गदर्शन
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  23 Jun 2022, 9:35 PM
   

मुंबई : बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचा नवा व्हिडीओ समोर आलाय. यामध्ये भाजपचा आपल्याला पाठिंबा असल्याचे ते म्हणत आहेत. कुठेही काही लागले तर कमी पडणार नाही, असा शब्द भाजपने आपल्याला दिल्याचे एकनाथ शिंदे सांगत आहेत. आपण फक्त एकजुटीने राहू. विजय आपलाच आहे, असा विश्वासही त्यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे. भाजप एक राष्ट्रीय शक्ती आहे. राष्ट्रीय पक्ष असल्याने बलवान आहे. आपल्याला मदतीचा त्यांनी शब्द दिलाय. तुमच्या पाठीमागे आमची पूर्ण शक्ती असल्याचे भाजप नेतृत्वाने आपल्याला सांगितले आहे. त्यामुळे आता आपण एकजूट राहण्याची आवश्यकता आहे, असे एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना मार्गदर्शन म्हणाले.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी माघारी यावे आणि महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याबाबत विचार करु, असे म्हटले होते. संजय राऊत यांनी ट्विटवरुन देखील आवाहन केले होते. आता एकनाथ शिंदे यांचा नवा व्हिडीओ समोर आल्याने राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी परतीचे दोर कापले आहेत, असेच प्रथमदर्शनी म्हणावे लागेल.
एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी गुरुवारी मेघालयचे मुख्यमंत्री पोहोचले होते. भाजप आमदार संजय कुटे आणि मोहित कंबोज सूरतपासून सोबत आहेत. एकनाथ शिंदे समर्थक आमदार थांबलेल्या सूरत आणि गुवाहाटी ही दोन शहरे भाजपशासित राज्यातील असल्याने भाजप आता थेट सक्रिय होऊन ठाकरे सरकार पाडण्यासाठी सक्रिय होणार का हे पाहावे लागणार आहे.

    Post Views:  213


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व