सद्गुरु अनिरुद्ध उपासना केंद्र अकोला तर्फे रक्तदान शिबिर संपन्न
अनिरुद्ध अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट या संस्थेअंतर्गत देशात मानवनिर्मित तसेच नैसर्गिक आपत्ती मध्ये संस्थेतील प्रशिक्षित स्वयंसेवक काम करतात. संस्थेमार्फत दरवर्षी पंढरपूर, आळंदी, मांढरदेवी यात्रा उत्सव तसेच मुंबई येथील गणेश उत्सव मध्ये वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्याकरिता प्रशासनासोबत राहून सहकार्य करते. अश्या विविध सामाजिक उपक्रमांचा भाग म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्या अनुषंगाने श्री अनिरुद्ध उपासना केंद्र, डाबकी रोड व सुधीर कॉलनी अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने डाबकी रोड अकोला येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. यामध्ये एकूण 23 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली..
सदर कार्यक्रम यशस्वीरित्या पार करण्याकरिता विलास निनोरे,विनोद निनोरे, विजय जांगडे, किरण निनोरे, विनोद जोशी, सुधीर पवार यांनी परिश्रम घेतले .
यासाठी अकोला रक्तपेढी, अकोला यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Post Views: 92