लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून पत्रकारांसाठी कायदेविषयक कार्यशाळा


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  2022-03-16
   

अकोला : लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून दैनिक,साप्ताहिक संपादक, प्रतिनिधी व डिजीटल मिडीया प्रतिनिंधींसाठी कायदेविषयक मार्गदर्शनासाठी एका कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
पत्रकारांना वृत्तांकनामध्ये प्रसिध्दीपूर्व व पश्चात येणाऱ्या अडचणी व त्याचे कायदेशीर निराकरण कसे करता यासंबंधी मार्गदर्शनार्थ हा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.यामध्ये सर्वश्री एड. नितीन अग्रवाल(माजी ज्युडी.मॅजि.) एड. राजेश जाधव व एड.राजेश कराळे हे विविध विषयावर मार्गदर्शन करतील.हा कार्यक्रम जैन रेस्ट्रो, ICICI Prudential च्या समोर,गणेश हॉटेलच्या लाईनमध्ये,जनता बँक,जठारपेठ शाखेच्या बाजूला,जठारपेठ चौक,अकोला येथे आयोजित केलेला आहे. यामध्ये सहभागी होण्यास ईच्छूक असणाऱ्या पत्रकार बांधवांनी आपली नावे श्री प्रदिप खाडे, राष्ट्रीय उपाध्यक्ष- लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ मोबा क्र ९८२२२३००२५ यांचेकडे दि.१८ मार्चपर्यंत अगोदर कळवावित. असे आवाहन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख  व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

    Post Views:  246


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व