ऐतिहासिक ग्रंथ सन्मान यात्रेत सहभागी होण्याचे अकोला मराठा सेवा संघाचे आवाहन
अकोला - जय जिजाऊ , छत्रपती संभाजी महाराज यांच्या बुधभुषणम् संस्कृत ग्रंथाचे पूर्ण हस्तलिखीत प्रा. अजय साहेबराव लेंडे यांनी केले असून सर्व शिवप्रेमींसाठी हा एक मोठा एैतिहासीक दस्ताऐवज उपलब्ध झाला आहे . सदर ग्रंथ सन्मानयात्रा दि. ६ जून २०२२ ला अमरावती येथून प्रारंभ होऊन जिजाऊसृष्टी सिंदखेडराजा येथे समारोप होणार आहे. या ग्रंथरथाचे अकोला शहरात दि.७ जून २०२२ ला दुपारी ५ वाजता मराठा सेवा संघ कार्यालय अकोला येथे आगमन होणार आहे. सायं ६ वाजता अकोला शहरातील मुख्य रस्त्यावरून ही ग्रंथ सन्मानयात्रा फिरून रात्री ९ वाजता डॅा.पं.दे.कृ.विद्यापीठ शेतकरी सदन अकोला येथे समारोप होणार आहे .या एैतिहासीक ग्रंथाचे स्वागत करण्यासाठी ग्रंथसन्मान यात्रेत अकोला शहरातील सर्व इतिहासप्रेमी नागरीकांनी मराठा सेवा संघ कार्यालय अकोला येथे मंगळवार दिनांक ०७ जून २०२२ ला सायंकाळी ६ वाजता उपस्थित राहून , छत्रपती संभाजी महाराज विरचीत बुधभूषणम् ग्रंथाचे स्वागत व पूजन करावे व ग्रंथ सन्मान यात्रेत सामील व्हावे ही नम्र विनंती आणि आवाहन मराठा सेवा संघ व ३३ कक्ष अकोला जिल्हा व छत्रपती संभाजी महाराज ग्रंथ सन्मान यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
Post Views: 223