स्थानिक गुन्हे शाखा पालघर! कर्तव्यनिष्ठ अधिकाऱ्याची नेमणूक


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  06 Sep 2024, 10:01 AM
   

संतोष घरत - जिल्हा प्रतिनिधी
पालघर : पालघर पोलिस विभाग मध्ये स्थानिक गुन्हे शाखा चे प्रभारी पदावर पालघर चे कर्तव्य दक्ष पोलिस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी प्रदिप पाटील यांची प्रभारी पदावर नेमणुक केली आहे. प्रदिप पाटील हे कल्याण येथे प्रभारी पदावर कर्तव्य बजावताना आपल्या कारकीर्द मध्ये रेकॉर्ड वर असलेल्या ११आरोपी वर मोका अंतर्गत कार्यवाही केली होती. त्याच प्रमाणे ९ आरोपी वर एम पी डी अंतर्गत कार्यवाही केली. विशेष म्हणजे कल्याण मध्ये झालेले चैन स्नेचिंग घटनांवर प्रतिबंध करून  गुन्हेगारांचा कर्दनकाळ होण्याचे मोठे यश मिळवळे होते.
 प्रदिप पाटील ह्यांची स्थानिक गुन्हे शाखा प्रभारी पदावर नियुक्ती झाल्यामुळे संपूर्ण  पालघरमधील ड्रग युक्त मादक पदार्थ, गुटखा तसेच केमिकल माफिया अशा गुन्ह्यांवर नियंत्रण आणतील अशी सर्व स्तरावरून आशा व्यक्त केली जात आहे.

    Post Views:  150


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख