सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचवणार : डॉ. प्रा. संकेत काळे


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  17 Oct 2022, 12:39 PM
   

अकोला : सामाजिक न्याय व विशेष साहय विभाग, साहा. आयुक्त समाज कल्याण अकोला, जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद अकोला, जिल्हा जाती पळतानी समिती अकोला तथा पंचफुलादेवी पाटील समाजकार्य महाविद्यालय खडकी अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक न्याय विभागाचा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व आनंदात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्राध्यापक संकेत काळे, प्रमुख उपस्थिती म्हणून ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे, समाज कल्याण च्या अधीक्षक रेखा ठाकरे ( भटकर ), महाविद्यालयाचे प्राचार्य केशव गोरे, महाविद्यालयाचे विभाग प्रमुख डॉ. प्रा. संदीप भोवते, आदी मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहून मार्गदर्शन केले यावेळी मार्गदर्शन करताना संस्थेचे अध्यक्ष डॉ.प्रा. संकेत काळे यांनी आपला अध्यक्षशिय भाषणामध्ये सोभोताना सांगितले की समाज कल्याण विभागाच्या शेकडो योजना असून या योजना समाजकार्य महाविद्यालयाच्या  विद्यार्थ्यांच्या माध्यमातून गावागावा शेवटच्या वंचित घटकापर्यंत पोहोचवणार असल्याचे प्रतिपादन केले. यावेळी सर्वप्रथम भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न ए पी जे अब्दुल कलाम, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, यांच्या प्रतिमेचे पूजन , हाराअरपण, दीप प्रज्वलानाने  कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली, यावेळी समाज कल्याण विभागाच्या विविध योजनांची माहिती प्रास्ताविकामध्ये अधीक्षक रेखा ठाकरे भटकर यांनी दिली. यावेळी समाजसेवक गजानन हरणे यांनी सेवा प्रमोधर्म या नात्याने समाज कल्याण विभागाने समाजातील गोरगरीब ,सर्वसामान्य, वंचित माणसापर्यंत समाज कल्याणाच्या विविध योजना त्यांना देऊन त्यांचे कल्याण करण्याचे आव्हान यावेळी मार्गदर्शन करताना केले. यावेळी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालक प्राध्यापीका अर्चना धरमे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. केतन वाकोडे यांनी केले. कार्यक्रमाला समाज कल्याण विभागाचे अधिकारी कर्मचारी तसेच समाजकार्य महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक प्राध्यापिका विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Post Views:  177


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व