कोल्हापुरात कुणी कितीही गप्पा मारल्या तरी सतेज पाटीलच जिंकणार होते


यावेळी प्रतीस्पर्धी असणारे भाजपाचे उमेदवार अमल महाडिक यांनी विधान परिषदेचा अर्ज मागे घेतला
 Chief Editor  28 Nov 2021, 2:13 PM
   

कोल्हापूर - काही दिवस राजकीय वातावरण तापलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील विधानपरिषदेची निवडणूक बिनविरोध पार पडली. पालकमंत्री सतेज पाटील यांची निवड झाल्याने कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. कोल्हापूर जिल्ह्याचेच नाहीतर राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले होते. यावेळी प्रतीस्पर्धी असणारे भाजपाचे उमेदवार अमल महाडिक यांनी विधान परिषदेचा अर्ज मागे घेतला. दरम्यान उपमुख्यमंत्री अजीत पवार (Minister Ajit Pawar) यांनी सतेज पाटील यांच्या विजयावर भाष्य केले आहे. ते पुण्यातील एका पत्रकार परिषदेत बोलत होते.
राज्यात विधानपरिषदेच्या बिनविरोध निवडणुकी संदर्भात अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला होता. तेव्हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध झाल्या, महाविकास आघाडीचा भाजपसोबत समझोता झाला का? तसेच सतेज पाटील आणि महाडिक हे एकमेकाला पाण्यात बघतात अश्या ठिकाणी निवडणुका बिनविरोध झाली याबद्दल प्रश्न विचारला. यावर अजित पवार उत्तर देताना म्हणाले की, बिनविरोधचा प्रस्ताव आधी कोणाकडून आला, भाजपकडूनच ना? तुम्हालाही माहितीय कोण आधी बोललं असं म्हणत पवारांनी पत्रकारांनाच प्रतिप्रश्न केला.

कोल्हापुरातील बिनविरोध निवडणुकीबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की, कोल्हापूरच्या जागेबाबत विरोधकांना आपला पराभव दिसत होता. काही जागांसाठी घोडेबाजार मोठा होणार होता म्हणून त्यांनी बिनविरोधचा प्रस्ताव ठेवला. पण कोल्हापुरात कोणी कितीही गप्पा मारल्या आणि आवाज काढला तरी सतेज पाटील निवडून येणार होते. कारण तिथे राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेनेची मते जास्त होती. यामुळे बाजू क्लिअर होती. यामुळे सतेज पाटील यांचा विजय निश्चीत होता असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. धुळ्यामध्येही अमरिश पटेल यांच्याबाबतीतही तसेच होते यामुळे हे कोणीही नाकारू शकत नाही.

    Post Views:  220


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख