अकोला : स्वामी विवेकानंदाची नुसती जयंती साजरी करून भागणार नाही त्यांनी दिलेले विचार आजच्या घडीला कृतीत आणण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ समाजसेवक गजानन हरणे यांनी नेहरू युवा मंडळ, निर्भय बनो जनआंदोलन, जिजाऊ महिला बचत गट कातखेड च्या वतीने आयोजित स्वामी विवेकानंद जयंती व मा जिजाऊ जयंती च्या निमित्ताने कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून मार्गदर्शन करताना केले. यावेळी सर्वप्रथम मा जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन व हारार्पण प्रमुख वक्ते गजानन हरणे, प्रा. विलास बोंद्रे, सरपंच सौ शोभा शिरसाट आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गावातील महिला व युवकांचा गौरव करण्यात आला आहे. यावेळी गावातील युवक युवती बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते. यावेळी गजानन हरणे यांनी माहितीचा अधिकार, ग्रामसभा 73 वी घटना दुरुस्ती दारूबंदीचा कायदा, रेशनिंग चा कायदा, महिलांविषयी अनेक योजना, व्यवसाय मार्गदर्शन आदी विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचे संचालन पूजा कांबळे, तर आभार विक्रांत आढावू यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता मंडळाचे पदाधिकारी, महिला बचत गटाचे पदाधिकारी, ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी व गावकऱ्यांनी परिश्रम घेतले.
Post Views: 320
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay