नाशिक : 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा (Marathi Sahitya Sammelan 2021) उद्घाटन पार पडले असून संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर (Jayant Narlikar) हे या कार्यक्रमाला अनुपस्थित राहिल्याबद्दल अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले (Kautikrav Thale Patil) पाटील यांनी खंत व्यक्त केली.
ठाले पाटील म्हणाले की, जयंत नारळीकर यांची प्रकृती ठीक नाही हे समजू शकतो पण जर ते किमान एक तास जरी या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असते तर सर्व रसिकांना आनंद झाला असता. या कार्यक्रमासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. ते म्हणाले, संमेलनासाठी हिंडता फिरता येणारा अध्यक्ष निवडला पाहिजे, शेकडो लोक आपल्याला पाहायला आले ही बाब लक्षात ठेऊन ते आले असते तर रसिकांना आनंदच झाला असता. जर भविष्यात अशी परिस्थिती ओढावली तरी दुसरा अध्यक्ष निवडण्यात यावा अशी तरतूद मंडळाच्या घटनेत असावी असे मत त्यांनी व्यक्त केले.
3 डिसेंबर ते ५ डिसेंबर या कालावधीत नाशिक शहरात होत असलेल्या या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनास संमेलनाचे मावळते अध्यक्ष फ्रान्सिस दिब्रिटो आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेसुद्धा प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत. दरम्यान संमेलनाच्या आयोजकांकडून नारळीकर संमेलनाला यावेत यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करण्यात आले. पण नारळीकरांच्या कुटुंबियांनी प्रकृती आणि आताचे वातावरण या पार्श्वभूमीवर संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितले.
Post Views: 188
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay