मुंबई: सध्या राज्यात राजकीय समीकरणं बदलत चालली आहेत. शिवसेना अन् भाजपमध्ये दुरावा आल्यानंतर राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली. आता भाजप मनसे युतीची चिन्हे आहेत. त्यावर आता प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. शिवसेनेच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी राज ठाकरेंच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. राज ठाकरे सत्तेसाठी लाचार झाले आहेत, असं मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत.
शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यानंतर मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. मधल्या काळात त्यांनी आपल्या पक्षाचा झेंडा बदलून भगवा केला. भाजपने शिंदेगटासोबत सरकार स्थापन केल्यानंतर मनसे-भाजपची सलगी वाढताना दिसतेय. अश्यात आता मनसे आणि भाजपची युती होईल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. वाढत्या भेटीगाठी पाहता मुंबई महापालिका निवडणुकीआधी मनसे-भाजप युती झाली तर वावगं वाटायला नको.
शिवसेना दसरा मेळावा घेते. म्हणून यांनाही आता दसरा मेळावा घ्यायला आहे. लोक बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी तिथं येतात. आता लोकांना उद्धव ठाकरेंना ऐकायचं असतं, त्यामुळे कुणी काहीही बोललं. कितीही मेळावे घेतले तरी सच्चा शिवसैनिक उद्धव ठाकरेंसोबत आहे, असंही मनिषा कायंदे म्हणल्यात.
हिंदुत्वाच्या मुद्द्याला धरुन शिंदे गटातील आमदार गुवाहाटीला गेले. सुर गोव्याला गेले, हिंदुत्वासाठी तिकडे गेलो असं म्हणतात. पण वास्तव लोकांच्या लक्षात आलं आहे, असंही मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत.
Post Views: 301
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay