अकोला : जिल्ह्यामध्ये गेल्या तीस वर्षापासून अनेक सामाजिक संस्था ,संघटनेच्या माध्यमातून समाजसेवा करीत असलेले अनेक पुरस्कार प्राप्त समाजसुधारक मा.गजानन ओंकार हरणे ,जिल्हा परिषद नगर, खडकी बु अकोला यांचा लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाच्या वतीने जैन रेस्ट्रो जठारपेठ चौक अकोला येथे शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ वऱ्हाडी साहित्यिक पुष्पराज गावंडे, तर जेष्ठ समाजसेवक राजाभाऊ देशमुख, लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक-राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार संजय देशमुख ,प्रदीप खाडे,शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे प्रशासकीय अधिकारी संजीवजी देशमुख, प्रा. संतोष हुशे, राजेन्द्र देशमुख,किशोर मानकर,सिध्देश्वर देशमुख,यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमाला पत्रकार अंबादास तल्हार,संदिप देशमुख,विवेक मेतकर मोहन शेळके,निशाली पंचगाम,अॕड.राजेश जाधव,मंगेश चऱ्हाटे, युवा पत्रकार राहुल राऊत, जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे ए.ओ.प्रशांत उकंडे, आदी मान्यवर उपस्थित होते .कार्यक्रमाचे संचालन मुख्याध्यापक मनोज देशमुख यांनी तर आभार प्रदर्शन राजेन्द्र देशमुख देशमुख यांनी केले.
Post Views: 373