राष्ट्रीय संमेलनात गृहमंत्री अमीत शहा यांचे हस्ते अकोला जिल्हा बँक सन्मानीत
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
13 Aug 2022, 7:48 PM
अकोला : गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमीत शहा यांनी नवी दिल्ली येथे दि. १२.८.२०२२ रोजी आयोजीत ग्रामिण सहकारी बँकेचे राष्ट्रीय संमेलनात संबोधीत करतांना सहकारी संस्था अधिक सक्षम होणे ही काळाची गरज आहे. तसेच शंभर वर्षा पेक्षा जास्त कालावधीपासून सहकारी बँक यशस्वीपणे कार्यरत असल्याचा अभिमान वाटतो, असे प्रतिपादन केले. तव्दतच अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यशस्वी सेवेची १०० वर्षे पुर्ण केल्याबाबतचा पुरस्कार अमीत शहा यांचे हस्ते बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत वैद्य यांनी स्विकारला. बँकेस मिळालेला सन्मान हा सर्व सामान्य शेतकरी, कष्टकरी, बँकेचे ग्राहक व हितचिंतक यांचा बँकेवरील अतुट विश्वासाचे प्रतिक असल्याचे मत बँकेचे अध्यक्ष डॉ. संतोषकुमार कोरपे यांनी व्यक्त केले. जिल्हा बँकेस मिळालेल्या सन्मानाबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. सदर राष्ट्रीय संमेलनात केंद्रीय सहकार राज्य मंत्री बी. एल. वर्मा, एनसीयूआय, ईफको तसेच नॅस्कॉब चे अध्यक्ष व सचिव भारत सरकार, नाबार्ड व इतर सहकारी संस्थांचे वरिष्ठ अधिकारी, निती आयोगाचे अधिकारी तसेच भारतातील सर्व राज्य सहकारी बँका आणि प्राथमिक सहकारी कृषी सहकारी सोसायट्यांचे प्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित होते.
Post Views: 237