एल. आर. टी च्या एन. सी. सी. कॅडेटचा पुणे येथील मेडिकल कोर्स-आर्मी अटॅचमेंट कॅम्पमध्ये सहभाग
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
01 Aug 2023, 3:14 PM
कमांड हॉस्पीटल (SC), पुणे येथील महाराष्ट्र बटालियन पुणे अंतर्गत एन. सी. सी. चा फर्स्ट एड मेडीकल कोर्स आर्मी अटॅचमेंट कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. पुणे महाराष्ट्र बटालियनचे कोर्स डेप्युटी कमांडर ब्रिगेडीयर ए. जी. माथुर व कोर्स कॉर्डिनेटर लेफ्टनंट कर्नल उषा थिंगबैजम यांच्या नेतृत्वात या कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. या कॅम्पमध्ये ११ महाराष्ट्र बटालियन अकोला च्या एल. आर. टी. कॉलेजचे कँडेट प्रणव इंगोले व कॅडेट नितिक्षा पांडे यांनी सहभाग घेतला होता. १० दिवस चाललेल्या या कॅम्प दरम्यान कॅडेट्सला नेतृत्व, सामान्य वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचार व्यवस्थापन, जखमांचे मलमपट्टी, स्वच्छता, योगासनांचा परिचय, शारीरिक आणि मानसिक आरोग्य, सी.पी.आर, बी.पी.चेक, फस्ट एड असे मेडीकल लाईनमधील वेगवेगळ्या टेस्ट शिकवण्यात आल्या. या कॅम्प मध्ये कँडेट प्रणव इंगोले व कॅडेट नितिक्षा पांडे या कॅडेटने कँपच्या प्रत्येक उपक्रमात सहभाग घेऊन उत्तम रित्या प्रदर्शन केले. या दोन्ही कॅडेटला मेजर जनरल भूपेश गोयल यांच्या हस्ते प्रमणपत्र देऊन सन्मानीत केले गेले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. डी. सिकची, वरिष्ठ प्राध्यापक डॉ. जी. जी. गोंडाणे, श्री. विजयभाऊ जयपिल्ले व एन. सी. सी. ऑफीसर कॅप्टन डॉ. अनिल तिरकर यांनी कॅडेट्सनी मिळविलेल्या यशाबद्दल त्यांचे कौतुक करून त्यांचा सत्कार केला. एन. सी. सी. कॅडेट्सनी मिळवलेल्या यशाबद्दल ११ महाराष्ट्र बटालियनचे कमांडिंग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल चंद्रप्रकाश भदोला तसेच बी. जी. ई. सोसायटीचे अध्यक्ष अॅड. मोतीसिंहजी मोहता, वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार तोष्णीवाल, कनिष्ठ उपाध्यक्ष इंजि. अभिजित परांजपे, मानद सचिव पवन माहेश्वरी, सहाय्यक सचिव सी. ए. विक्रम गोलेच्छा व समस्त माननीय कार्यकारी सदस्यांनी सुद्धा शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले.
Post Views: 69