समाजशील, निर्भिड पत्रकारितेचा महामेरू ... संजय देशमुख निंबेकर ..!
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
2022-05-04
वास्तवतेचे भान ठेऊन सत्त्त्य तेच निडरपणे मांडणारा पत्रकार म्हणजे विश्वप्रभातकार संजय देशमुख ....!पत्रकारांच्या लेखणीला लगाम लावणाऱ्या अपप्रवृत्तींना भिक न घालता, परिनामांची तमा न बाळगता, जळजळीत वास्तव सत्त्य समाजासमोर ठेवणारा निर्भिड पत्रकारितेचा महामेरू संजय देशमुख,...! लहाणपणापासूनच संतांच्या आशिर्वादाने,समाजशील विचारांनी सरस्वतीचा वरदहस्त प्राप्त म्हणून जाणवलेले सारस्वत म्हणजेच संजय एम. देशमुख निंबेकर ...! आपल्या स्वच्छ,सत्त्य आणि विधायक विचारांनी ज्यांनी पत्रकारांची अफाट अशी राष्ट्रीय संघटना स्थापन केली.त्या माध्यमातून अभिव्यक्तीस्वातंत्र्याची मुस्कटदाबी करणाऱ्या हूकूमशाही प्रवृत्तींना झुगारून लोकशाहीचा आधारस्तंभ अधिक बळकट करण्याचे कार्य त्यांनी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघातून सुरू केलेले आहे.अनेक क्षेत्रातील बहूआयामी गुणीजणांची मांदियाळी सोबत घेऊन पत्रकारिता आणि सामाजिकतेच्या संकल्पनेतून भेदातित वाटचालीचा प्रारंभ केलेला आहे....!
अकोला जिल्ह्यात बाळापूर तालूक्यातील एक छोटं पण आदर्श गांव निंबा..! येथील सर्वसाधारण शेतकरी कुटूंबातील साधं, सरळ, सालस, प्रेमळ व्यक्तीमत्व! आपल्या स्वकर्तृत्वाने किर्तीचा सुगंध सर्वत्र दरळविणारा सच्च्या दिलाचा जिगरबाज माणूस, सर्वस्पर्शी अनुभवसिध्द संवेदनशील जेष्ठ पत्रकार, आणि आता अकोल्यातून एक वर्षापूर्वी स्थापन झालेल्या लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या राष्ट्रीय संघटनेचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष ते आहेत. आक्रमक, तात्विक शब्दशैलीने मर्मभेदी लिखाणातून समाजाच्या समस्यांना वाचा फोडून शासन, प्रशासन आणि राजकीय नेत्यांना लेखणीतून प्रखर जाणीव देणारे अग्रलेखांचे दुसरे बादशहा, तेच संपादक संजय माणिकराव देशमुख,निंबेकर ......!३ मे १९६६ रोजी ज्यांचा जन्म....त्यानिमित्ताने या शुभपर्वावर त्यांना जन्मदिनाच्या आणि सर्वांगसुंदर स्वास्थप्राप्तीसोबतच भविष्यातील आनंदमयी यशस्वी वाटचालीसाठी..... तथा त्यांच्या जिगरबाज लेखणीची धार सामाजिक जाणीवेतून अधिक प्रखर होवो....यासाठी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ, विश्वप्रभात परिवार,मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्था,महाराष्ट्र मुद्रण परिषद,अकोला जिल्हा मुद्रक संघ व ईतर सर्व संघटना व मित्र,स्नेही परिवार,आप्तस्वकीय,व हि़तचिंतकांच्या वतीने शतश: हार्दिक शुभेच्छा....!
निंबा येथून १९८५-८६ च्या दरम्यान नागपूरच्या नागपूर पत्रिका या दैनिकासोबतच देशोन्नती, तरूण भारत,महासागर या वृत्तपत्रांमधून पत्रकारितेचा शुभारंभ केला,व नंतर दै.देशोन्नतीच्या शुभारंभ अंकापासून आणि त्यावेळी तेथूनच साप्ता. वृत्तसंजीवनीच्या प्रकाशनातून त्यांनी आपल्या पत्रकारिता आणि सामाजिक कार्याचा शुभारंभ केला.पत्रकारिता आणि शासन प्रशासनासोबत पत्रलेखनातून सामाजिक समस्यांना वाचा फोडत, असंख्य उपक्रमातून आपली सामाजिकता निंबा परिसरातून त्याकाळापासून सिध्द केली. या कालावधित बाळापूर तालूका युवक काँग्रेस उपाध्यक्षपदाच्या व ईतर संघटनांच्या माध्यमातून बससेवा, स्थलांतराची शक्यता असलेले निंबा फाटा येथील विद्युत सबस्टेशन व ईतर मुलभूत सुविधांकरीता आंदोलनांच्या ईशाऱ्यांसह शासकीय पत्रव्यवहार करून पाठपुरावे केले.गावातील अपूऱ्या पाणीपुरठ्यावर चिंतन करून १९९८ साली शासनाच्या योजनेतील ३८ लाखाची कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना,रस्ते,तालूक्यातून प्रथम क्रमांकावर इंदिरा आवास घरकूलांसारख्या योजनांमध्ये त्यावेळी निंबा गाव अग्रेसर ठेवणे ही त्यांची ठळक कामे होती.
वझेगावच्या ब्रम्हलीन श्री.रामचंन्द्र महाराजांचा शब्द कसांडी..... या आध्यात्मिक त्रैमासिकाचा शुभारंभ आणि त्याकरीता मुंबई व महाराष्ट्र व ईतरत्र फिरणे, यातूनच त्यांचे माजी राज्यपाल शिक्षणमहर्षी पद्मश्री डॉ.डी.वाय.पाटील यांचेशी स्वामी जोमानंदांच्या माध्यमातून संपर्क आले. डॉ.डी.वाय पाटील यांचे स्विय सचिव म्हणून १९९१ ते १९९४ पर्यंत मुंबईत कार्यरत होते.सध्या ते अकोल्यात तापडिया नगर मधील सहयोग प्रिन्टर्सचे प्रोप्रायटर असून डी.वाय. पाटील विद्यापीठालाही २१ वर्षापासून प्रिन्टीग मटेरियल पुरवठा करतात. आर्थिक, व्यावसायिक वाटचालीतही शिस्तबध्द, तात्विक वाटचाल आणि निश्चित वेळेतील नियमित कार्यशैलीने उच्च क्रेडीट स्कोअरप्राप्त यशस्वी उद्योजक म्हणूनही ते सिध्द आहेत.चार वर्ष दुसऱ्या पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर १३ फेब्रू २०२१ ला अकोल्यातून त्यांनी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या अखिल भारतीय संघटनेची स्थापना केली.सामाजिक व पत्रकारितेतील कर्तव्यनिष्ठ आणि बांधिलकींच्या असंख्य उपक्रमांनी, पत्रकारांवरील अन्यायांना वाचा फोडण्याच्या प्रसंगावधानपर भुमिकांनी अल्पावधितच तिला महाराष्ट्रभरात प्रतिसाद मिळून महासागराच्या दिशेने जाणाऱ्या या प्रवाहाला ईतर राज्यांच्या दिशाही आता खुणावत आहेत. असा हा विश्वप्रभातचे संपादक संजय देशमुख यांचा प्रतिकुल परिस्थितीतील आजपर्यंतच्या संघर्षमय वाटचालीचा जन्मदिनाच्या निमित्ताने समोर ठेवलेला परिचय आहे..!.
मुंबईच्या नोकरीतील जीवनामध्ये अनेक विविध क्षेत्रातील मोठमोठ्या समारंभांना त्यांची उपस्थिती, गाठीभेटी, कधी वसंत कानिटकरांना पद्मश्री मिळाली तेव्हा राष्ट्रपती भवनात, हरियाणामध्ये भोंडशीच्या आश्रमात माजी पंतप्रधान स्व.चंद्रशेखरजी यांचेशी भेट, ईतरत्र डॉ. डी.वाय.पाटील यांचेसोबत उपस्थिती, कधीकाळी त्यांच्या अनुपस्थितीत प्रतिनिधी म्हणून थोरामोठ्यांचे आदरातिथ्य, मंत्रीगणांच्या,तर कधी मातोश्रीवर मा.स्व.श्री बाळासाहेब ठाकरे व मान्यवरांच्या भेटीगाठी, मंत्रालयीन कामकाज, असा नित्यक्रम सुरू होता. डी.वाय.पाटील स्वागताध्यक्ष राहिलेल्या ६५ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी मुंबईतील पत्रकार,आकाशवाणी,दुरदर्शन,व सर्व मिडीया प्रतिनिधी,जेष्ठ साहित्त्यिक,व निमंत्रितांच्या व्यवस्थेची जबाबदारी स्विय सचिव म्हणून संजूभाऊनी त्यावेळी यशस्वी रितीने समर्थपणे पार पाडली.त्यामुळे त्यावेळी व नेहमीच्या कार्यशैलीमुळे ते साहेबांसह संपूर्ण डी.वाय.पाटील परिवाराच्याही प्रशंसेलाही अनेकदा पात्र ठरले,हे त्यांचे मुंबईच्या सेवाकाळातील प्राप्त यश होते. मॉरिशस मराठी मंडळाचे पदाधिकारी ज्यांनी मुंबईत येऊन मराठीमध्ये एम.ए. केलं ते मॉरिशसमधील होमराजन गौरियांसारखे परदेशी मित्र,तर अनेक परदेशी पुरस्कारप्राप्त, व्यंगचित्रांवर १४ पुस्तकं लिहणारे,कोल्हापूरच्या साहित्त्य संमेलनाचे साक्षीदार प्रख्यात व्यंगचित्रकार श्री संजय मिस्त्री,असे त्यांचे अनेक मित्र येथे व परदेशातही आहेत. प्रसिध्द गितकार स्व.जगदीश खेबुडकरही त्यांचे नियमित मित्र,हितचिंतक होते. संजुभाऊंच्या लग्नाचं मंगलाष्टकही त्यांनीच त्यावेळी लिहलं होतं. परंतू स्वतंत्र वाटचालीतून काहीतरी नवनिर्मितीच्या ध्यासातून थोडीशी डॉ.डी.वाय पाटीलसाहेबांचीही नाराजी पत्करत त्यांनी उत्कृष्ट कामाचे प्रमाणपत्र घेऊन मुंबई सोडली. परंतू त्यानंतरही डॉ.डी.वाय.पाटीलसाहेबांसोबतचे त्यांचे ऋणानुबंध,गाठीभेटींमधील प्रदिर्घ स्नेहसंवाद आजही नियमित सुरू आहेत.
त्यानंतर निंबा त्यादरम्यान ग्रा.पं निवडणूक होती.येथे १९९५ साली मागासवर्गीय स्त्री राखीव जागा व निरक्षर महिला सरपंच होणार असल्याने,संजुभाऊंचा एवढ्या वर्षाचा व मुंबईतीलही कामकाजाचा आपल्या ग्रामविकासासाठी उपयोग करून घेण्याचे ग्रामस्थांनी ठरविले.त्यानुसार तेथील उपसरपंचपदाची माळ नागरीकांनी अविरोधपणे त्यांच्या गळ्यात टाकली. या कालावधित त्यांनी ग्रामविकासासाठी प्रचंड मेहनत घेतली.तो कार्यकाळ पूर्ण करून डिसेंबर १९९९ मध्ये अकोला येथे सहयोग प्रिन्टर्सच्या माध्यमातून प्रिन्टीग व्यवसायाला झिरो बजेटमधून सुरूवात केली. सरपंच पदाच्या कारकिर्दीतून अनेक चांगल्या,वाईट प्रसंगांना सामोरे जात या राजकारणाला पूर्णविराम देऊन ते अकोला स्थाईक झाले. आज अकोल्यात ते साप्ता.विश्वप्रभात वृत्तपत्र व न्यूजपोर्टल या व्यापक प्रसार असलेल्या माध्यमाचे मालक संपादक आहेत. ते अ.भा.गुरूदेव सेवा मंडळाच्या उपक्रमातही सामील असून तिथे जिल्हा प्रसिध्दीप्रमुख आहेत. एक समाजशील धाडसी पत्रकार म्हणून त्यांना महाराष्ट्र पत्रकार भूषण,उत्कृष्ट संपादक भूषण व पुण्याच्या मनिभाई देसाई प्रतिष्ठाणाचा राष्ट्रसेवा पुरस्कार, व आतापर्यंत असे अनेक सन्मान,बहूमान प्रशस्तीपत्र प्राप्त झालेले आहेत. कोरोनाकाळात आणि नेहमी रूग्णांना व समाजाला लुटणाऱ्या अपप्रवृत्तींवर आणि लोकांच्या जीवाशी खेळणाऱ्या प्रशासन तथा राजकारण्यांच्या अमानवीय वाटचालीवर आपल्या जहाल लेखणीतून प्रहार करण्याचे जनजागृतीकार्य या निर्भिड पत्रकारांनी व्यापक प्रमाणात केलेले आहे, आणि ते समाजातील संवेदनशील लोकांच्या प्रशंसेला पात्र ठरलेले आहेत. संजूभाऊंच्या अंतरंगातून समाजाच्या वेदनांना शब्दबध्द करणाऱ्या व विधायक अपेक्षांसह शासन-प्रशानाला आवाहन करणाऱ्या जहाल शब्दशैलीतील सामाजिक संपादकीय लेखांना अनेक प्राध्यापक, पत्रकार आणि मराठी विषयातील आचार्यांनी आनंदमिश्रित कौतुकास्पद शब्दांनी भरभरून दाद दिलेली आहे. हे त्यांना अल्पवयातून सुरू केलेल्या पत्रकारितेतील सरावातून मिळालेले गौरवास्पद यश आहे.प्रतिभाशक्तीचा सामाजिक साधनेत प्राप्त झालेला तो आशीर्वाद म्हणावा लागेल...!
शासनाच्या सहकारनिष्ठ पुरस्कारप्राप्त मानवधर्म नागरी सहकारी पतसंस्थेत ते गेल्या अठरा वर्षापासून कार्यरत असून विद्यमान अध्यक्ष व या अगोदर सचिव आणि उपाध्यक्ष राहिलेले आहेत. संस्थापक-अध्यक्ष असलेले स्व.स्वामी शांतानंद सरस्वती महाराज यांच्यासोबत कडक शिस्तीत त्यांनी सहकारातील कार्यशैलीचाही अनुभव घेऊन अभ्यास केला. त्यांनी हयात असतांनाच नंतरचे अध्यक्ष म्हणून संजूभाऊंच्या नावावर शिक्कामोर्तब करून ठेवलेले होते. भारतातील वृत्तपत्रांच्या प्रकाशक,मालकांची संघटना असलेल्या इंडियन लँग्वेज न्युजपेपर्स (ईलना) या संघटनेतही ते सहभागी असून, यासोबतच मुद्रक व्यावसायिकांच्या राज्यपातळीवरील महाराष्ट्र मुद्रण परिषदेत तथा अकोला जिल्हा मुद्रक संघात उपाध्यक्ष म्हणून सुध्दा ते कार्यरत आहेत. अशा या व्यक्तिमत्वाचा आज अभिष्टचिंतन कार्यक्रम ठेवणाऱ्या सर्व पदाधिकारी, सहकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन..! पत्रकारिता, समाजकारण, राजकारण, सहकार, संस्कृती, अध्यात्म आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्यक्ष कार्यातून स्वत:ला घडवत जाणाऱ्या सर्वस्पर्शी, अष्टपैलू व्यक्तीमत्वाला ईश्वरी शक्तीचे वरदान प्राप्त होवो आणि त्यांचे कार्य भव्य,दिव्य व्यापक स्वरूपात साकारीत होऊन त्याचा सामाजाला अधिकाधिक लाभ होवो ह्याच सदिच्छा,आणि पूनश्च त्यांना जन्मदिनाच्या खूप खूप शुभेच्छा ..!
मनोज बा. देशमुख,
मुख्याध्यापक-श्री शिवाजी विद्यालय,राजंदा,ता.बार्शीटाकळी , जि.अकोला
मोबा.क्र.८३२९२५३९३४, ९०२८६५५७११
Post Views: 258