पालघरचे उपजिल्हाधिकारी जाधवर लाच घेताना रंगेहात पकडले...


 विश्व प्रभात  2024-08-16
   

(संतोष घरत) पालघर  :  पालघर जिल्ह्याचे सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर यांना एका जमिनीच्या प्रकरणात ५० हजार रुपयाची लाच घेताना मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यालयातच अटक केली आहे. मुंबईच्या लाच लुचपत प्रतिबिंब विभागाच्या पथकाने सापळा रचून जाधवर यांना अटक  झाली.
   जाधवर ह्याची पालघर मधून   रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर येथे  बदली झाली होती.  पालघर जिल्ह्यातील वाडा येथील एका आदिवासी खातेधारकाची जमीन नावावर करण्यासाठी लाच घेतल्याचे उघडतीस आले आहे. आदिवासी असलेले तक्रारदार याने आपल्या जमिनीचे प्रकरण मंजूर करण्यासाठी जाधवर ह्याच्या कडे गेले होते. नियमानुसार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर ही मान्यता देण्यासाठी उपजिल्हाधिकारी जाधवर यांनी तक्रारदाराकडे ५० हजाराची लाच  मागितली होती.
     सर्व प्रक्रियापूर्ण करून सुद्धाउपजिल्हाधिकारी जाधवर ह्याने लाचेची मागणी केल्यानंतर  तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने मुंबईच्या प्रतिबंधक विभागाकडे तशी तक्रार दाखल केली होती. 
      मंगळवारी दुपारच्या सुमारास राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग याच्या अध्यक्षांची पत्रकार परिषद पूर्ण झाल्यानंतर जाधवर आपल्या कार्यालयात आले. तदनंतर  तक्रारदारानी त्यांच्या कार्यालयात येऊन संपर्क साधल्यानंतर कार्यालयातच ५० हजार रुपयाची लाच स्वीकारताना त्यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने झडप घातली. या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया उशिरा पर्यंत सुरू होती. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात एकच खळबळ मजली असून भ्रष्ट असणाऱ्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मुंबई लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचा पुढील तपास सुरू असून तपासाअंती किती करोडचा भ्रष्टाचार झालेला आहे हे दिसून येईल.

    Post Views:  50


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व