अथर्व बाहेती शिष्यवृत्ती परीक्षेत अकोला जिल्ह्यात सर्वप्रथम
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
07 Jan 2023, 5:02 PM
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारे जुलै 2022 मध्ये आयोजित पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत अथर्व महेश बाहेती याने अकोला जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम स्थान प्राप्त करून उज्वल यश मिळविले आहे त्याला 86.57% गुण प्राप्त झाले असून प्रथम मेरिट रँक प्राप्त झाली आहे.
अथर्व बाहेती हा निशू नर्सरी व कोठारी कॉन्व्हेंट मध्ये सहाव्या वर्गात शिकत असून आतापर्यंत त्याला विविध स्पर्धा परीक्षांमध्ये 18 स्वर्ण पदक प्राप्त झाले आहेत. इतकेच नव्हे तर वक्तृत्व स्पर्धा विज्ञान प्रदर्शनी प्रेझेंटेशन इत्यादी मध्ये सुद्धा त्याला पारितोषिक मिळाले आहेत.
आतापर्यंत अथर्वने विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उज्वल यश संपादन केले असून विशेषता नॅशनल सायन्स ओलंपियाड नॅशनल इंग्लिश ओलंपियाड नॅशनल मॅथ ओलंपियाड विज्युअल लिसनिंग आणि युसी मास अबकस स्पर्धां परीक्षा मध्ये विविध पुरस्कार प्राप्त करून अकोला जिल्ह्याचा नावलौकिक वाढविला आहे.
यासाठी त्याला त्याची आई सौ जया बाहेतीआणि वडील प्रा महेश बाहेती तसेच शिक्षक श्री सदानंद कळंब यांचे मार्गदर्शन लाभले आहे अथर्वने प्राप्त केलेल्या यशाबद्दल प्राचार्य डॉ सत्यनारायण बाहेती सौ तारा बाहेती प्रा डॉ देवकिसन बाहेती सौ ज्योती बाहेती बीजी सोसायटीचे अध्यक्ष एडवोकेट मोतीसिंह मोहता डॉक्टर सतीश राठी डॉ महेश गांधी अकोला जिल्हा पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष श्री सुरजमल शर्मा आदींनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
Post Views: 198