ईलना फेरनियुक्तीबध्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाकडून प्रकाश पोहरे यांचा सत्कार


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  11 Aug 2022, 10:40 PM
   

अकोला -इंडीयन लॕंग्वेज न्यूजपेपर्स (ईलना) या देशभरातील  सर्वभाषिक वृत्तपत्रांच्या संपादक प्रकाशकांच्या राष्ट्रीय संघटनेत दै देशोन्नतीने एडीटर इन चिफ व आक्रमक लढवय्ये शेतकरी नेते श्री प्रकाश जी पोहरे यांची उपाध्यक्षपदी फेरनिवड झाली.त्याबध्दल लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ या समाजाभिमुख राष्ट्रीय संघटनेकडून त्यांचा त्यांच्या कार्यालयात शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष संजय एम.देशमुख यांचेसह केंद्रीय उपाध्यक्ष किशोर मानकर,सचिव राजेन्द्र देशमुख,पुष्पराज गावंडे,सौ.जया भारती इंगोले,जिल्हा उपाध्यक्ष मोहन शेळके उपस्थित होते.
       ईलना ही देशातील ७९ वर्ष जूनी सर्वभाषिक वृत्तपत्रांच्या संपादक प्रकाशकांची संघटना असून यावर्षी गोवा येथे दि.०५ ऑगस्ट रोजी झालेल्या ७९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रकाशजी पोहरे यांची सलग चौथ्या वेळेला उपाध्यक्षपदावर अविरोध निवड करण्यात आली.त्यांचेसोबत अकोल्यातून लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे संस्थापक- राष्ट्रीय अध्यक्ष व साप्ता.विश्वप्रभात वृत्तपत्र व न्युज पोर्टलचे संपादक संजय देशमुख यांची सुध्दा या राष्ट्रीय कार्यकारिणीत अविरोध निवड झाली आहे. 
                ईलना ही देशातील एक प्रतिष्ठीत नावलौकिकप्राप्त संघटना असून तिच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अनेकवेळा राष्ट्रपती आणि पंतप्रधान उपस्थित राहिलेले आहेत.माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी सुध्दा एका सभेला हजेरी लावलेली आहे.
              अकोला येथील जेष्ठ पत्रकार म्हणून प्रकाश पोहरे यांना सलग चौथ्यांदा मानाचे स्थान  आणि कार्यकारिणी पदाधिकारी म्हणून संजय देशमुख यांची नवनियुक्ती याबाबत लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व सर्व पत्रकारांकडून दोन्ही पदाधिकाऱ्यांचे सानंद अभिनंदन करण्यात आले.

    Post Views:  277


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व