विद्यापीठ हायस्कूल प्रशालेस हरित शाळा पुरस्कार


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  25 Feb 2025, 8:26 AM
   

पुणे - वनराईचे संस्थापक अध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री पद्मविभूषण डॉ.मोहन धारिया यांच्या जन्मशताब्दी निमित्त वनराई तर्फे पर्यावरण शिक्षण उपक्रमांचे आयोजन  पुणे शहरात करण्यात आले होते. विविध प्रशालेतील विद्यार्थ्यांनी पर्यावरण विषयक गाणी, नाटक सादरीकरण केले. 
 महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या विद्यापीठ हायस्कूल प्रशालेस हरित शाळा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विद्यापीठ हायस्कूल  मध्ये पर्यावरण विषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण विषयक जाणीव निर्माण व्हावी या हेतूने प्रशालेत कागदी व कापडी पिशव्या निर्मिती, बीज संकलन,रोपे लागवड व संवर्धन, वृक्षदिंडी ,जलदिंडी,औषधी वनस्पतींची लागवड व संवर्धन, औषधी बाग निर्मिती, परिसरातील विविध वृक्षांची ओळख, परिसरातील विविध दगडांचे संकलन व जतन, पर्यावरण विषयक व्याख्यानांचे आयोजन यासारख्या अनेक उपक्रमांचे आयोजन प्रशालेत मुख्याध्यापक विष्णू मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले .
 डॉ.रोहिदास मोरे व सागर धारिया यांच्या हस्ते विद्यापीठ हायस्कूल प्रशालेस हरित शाळा पुरस्कार  देऊन गौरवण्यात आले. 
लिटल चॅम्प्स गायिका अंजली गायकवाड हिच्या हस्ते विद्यार्थिनी सोनाली घोडके हिला पर्यावरण विषय प्रकल्प सादरीकरण पुरस्कार , प्रशालेतील शिक्षिका वैशाली सैंधाणे यांना उपक्रमशील शिक्षिका पुरस्कार तर स्मिता जाधव यांना  सर्वोत्कृष्ट हरित शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.प्रशालेतील विद्यार्थ्यांनी प्लास्टिकचा भस्मासूर हे नाटक सादरीकरण केले. 
  याप्रसंगी विद्यापीठ हायस्कूल प्रशालेचे मुख्याध्यापक विष्णू मोरे, संचालक बसवंत विठाबाई बाबाराव, सचिव अमित वाडेकर, अकोल्याचे बबनराव कानकिरड, विविध शाळातील मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने याप्रसंगी उपस्थित होते.

    Post Views:  45


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व