१० वर्षांपासून प्लॅनिंग! लॉरेन्स गँगने असा रचला राजू थेठच्या हत्येचा कट


 विश्वाप्रभात न्यूज ब्युरो  03 Dec 2022, 3:18 PM
   

राजस्थानमधील सीकरमध्ये पुन्हा एकदा गँगवॉरची घटना समोर आली. प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला याच्या हत्येची जबाबदारी घेतलेल्या बिश्नोई गँगनेच राजस्थानी गँगस्टर राजू थेठ याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने हत्येच्या नंतर दोन तासांतच या घटनेची जबाबदारी घेतली. एका फेसबुक पोस्टमध्ये, बिश्नोई गँगचा रोहित गोदारा याने हत्येची जबाबदारी घेतली. बलवीर आणि आनंदपाल यांच्या हत्येचा हा बदला घेतला गेला, असेही त्याने सांगितले.

गँगस्टर राजू थेठ त्याच्या घरी पीजी हॉस्टेल चालवत असे. या हल्ल्यात राजू थेठसह पीजीमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्याच्या वडिलांचा या गोळीबारात मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. हल्ल्याच्या वेळी एक व्यक्ती व्हिडिओ बनवत होता. त्याच्या पायालाही गोळी लागली आहे. राजू थेठ यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेत अन्य एकूण तीन जणांना गोळ्या लागल्या होत्या. 

    Post Views:  152


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व