अकोला ः प्रभात किड्स स्कूलचा खुश नरेंद्र बन्सल विभागस्तरीय योगा स्पर्धेत उत्कृष्ट यश प्राप्त केल्याने त्याची राज्यस्तरीय योगा स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा संकुल व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तरीय योगा स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, बुलडाणा येथे दि. 18 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आले होते.
या स्पर्धेत 14 वर्षाआतील मुलांमध्ये खुश बन्सल ह्याची राज्यस्तरावर निवड झाली आहे. खुशला योगा कोच मयुरी इंगळे यांचे मार्गदर्शन लाभले.
प्रभातचे संचालक डॉ. गजानन नारे, संचालिका सौ. वंदना नारे, सचिव निरज आवंडेकर, प्राचार्य वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, क्रीडा विभाग प्रमुख संतोष लोमटे यांच्यासह शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचार्यांनी खुश बन्सलचे कौतुक केले असून राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
Post Views: 123
सर्व
सर्व
admin@sanjay
admin@Sanjay