अकोला जिल्ह्य़ातील सांगळुद येथील ईसम येथीलच लोणार नाल्यात वाहुन गेलेल्या ईसमाचा मृतदेह आढळून आला
३ किलोमीटर नदीच्या पाण्यामध्ये शोध मोहीम यशस्वी
अकोला - कुरणखेड येथील विर भगतसिंग आपत्कालीन पथकाला यश. बोरगाव मंजु पोलीस ठाण्याचे केदार सर यांच्या नेतृत्वाखाली घेतला शोध.
आज मुसळधार पावसाने बार्शीटाकळी तालुक्यातील दोन्ही मार्ग बंद झाले होते. बार्शीटाकळीचे तहसीलदार राज वजीरे साहेब यांच्या आदेशाने आपत्ती व्यवस्थापन अधिकारी संदीप साबळे साहेब आणी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाऊंडेशनच्या संत गाडगे बाबा आपात्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जिवरक्षक दिपक सदाफळे आणी सहकारी ऋषिकेश राखोंडे,संजय इंगळे,चेतन इंगळे हे लाईफरींग लाईफजाॅकेटसह वायर रोप सेटप घेऊन सज्ज आहेत. अकोला ते बार्शिटाकळी रोड चालु झालेला आहे.पाणी कमी झाले तसेच बार्शीटाकळी ते सिंदखेड मार्गे शहापूर नाल्यावरुन पाणी असल्याने हा रोड बंद होता आता हा रोड पण चालु झाला सद्यस्थितीत पाऊस रिमझिम चालुच आहे कान्हेरी सरप जवळील बार्शीटाकळी ते अकोला रोडवरील विद्रूपा नदीला पुर आहे पुलापासून तीन चार फुट खाली आहे तेव्हा खात्री करुनच पुल पास करावा. पुन्हा पाऊस वाढला तर परत दोन्ही रोड बंद होऊ शकतात यामुळे शक्यतो आज रात्रीचा प्रवास टाळावा कीवा जायचेच असल्यास खात्री केल्याशिवाय जाऊचनये.काही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ 9822229471 या नंबरवर संपर्क साधून घटनास्थळ लोकेशन सह लागणारी मदत या बाबतीत माहीती द्यावी अशी माहीती पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली आहे.
Post Views: 133