११ महाराष्ट्र बटालियन येथे १४४ एन.सी.सी. कॅम्पला सुरुवात
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
06 Oct 2022, 6:18 PM
पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ, अकोला येथे ११ महाराष्ट्र एन.सी.सी. बटालियन यांचा दि. ४ ऑक्टोबर २०२२ पासून सी. ए. टी. सी. कॅम्प 144 ला सुरुवात झाली. ११ महाराष्ट्र बटालियनचे एडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर लेफ्टनंट कर्नल सी. पी. भदोला यांच्या नेतृत्वामध्ये या कॅम्पचे आयोजन होत आहे. या कॅम्प मध्ये एकूण 312 एन.सी.सी. कॅडेट्सनी सहभाग घेतला असून आठ दिवस चालणाऱ्या या कॅम्प दरम्यान त्यांना नेतृत्व, एबट्रेकल, फायरिंग तरीच त्यांच्या कलागुणांना चालना देण्यासाठी प्रभावशाली मार्गदर्शन करण्यात येत आहे. या कॅम्प ला अमरावती ग्रुप चे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर शांतनु तसेच कमांडिंग ऑफिसर कर्नल चौधरी यांचे सुद्धा मार्गदर्शन लाभणार आहे. या कॅम्पसाठी एल.आर.टी. कॉलेजचे ऑफिसर लेफ्टनंट डॉ. अनिल तिरकर, एल.आर.टी. कॉलेज निवड करण्यात आलेली असुन पंजाबराव कृषी विद्यापीठाचे डॉ. उज्वला शिरसाट व चीफ ऑफिसर पराग राऊत, होली क्रॉस स्कूल यांच्या देखरेख खाली या कँपचे आयोजन करण्यात आले. सुभेदार मेजर अशोककुमार यांच्या अंतर्गत या कॅम्पचे नियोजन होत आहे. कॅम्पसाठी कॅम्प कॅडेट एडजुयेंट रोहित डिगे व बटालियन कॅडेट एडजुयेंट मीनल रेड्डी व बटालियन कॅडेट एडजुयेंट आकाश शिरसाट या तिघांच्या नेतृत्वात या कॅम्पला सुरुवात झाली आहे.
Post Views: 248