मराठा सेवा संघाच्या राष्ट्रीय संघटक पदी दादाराव पाथिकर, राज्य उपाध्यक्षपदी गजानन हरणे
विदर्भ अध्यक्ष पदी राजेश घोगरे, जिल्हा अध्यक्षपदी वैभव चौधरी तर महिला आघाडी जिल्हाध्यक्षपदी योगिता श
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
08 Dec 2023, 1:49 PM
अकोला - अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे राज्यात, विदर्भात, अकोला जिल्ह्यात काम वाढवण्यासाठी अनेक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती संस्थापक अध्यक्ष विजयसिंह महाडिक यांनी जाहीर केल्या असून त्यांना तसे नियुक्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये अकोला जिल्ह्यातील अनेक मान्यवरांना, समाजसेवकांना महत्त्वाच्या पदावर नियुक्ती देण्यात आला आहे .त्यामध्ये दादाराव पाथीकर राष्ट्रीय संघटक, गजानन हरणे राज्य उपाध्यक्ष, राजेश घोगरे विदर्भ अध्यक्ष, अजय शेळके विदर्भ संघटक, सुरज अंधारे विभागीय अध्यक्ष, वैभव चौधरी जिल्हाध्यक्ष अकोला, प्रमोद धर्माळे जिल्हा संघटक अकोला, योगिता शेळके जिल्हाध्यक्ष महिला आघाडी अकोला आदी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती जाहीर केला असून त्यांना संघटन वाढवण्यासाठी अधिकार देण्यात आले आहे. मराठा सेवा संघ गेल्या कित्येक वर्षापासून मराठा समाजातील लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी व त्यांच्यात आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीय जीवनात बदल घडवण्यासाठी सातत्याने काम करीत आहे. मराठा समाजाला संघटित करीत आहे. देशाच्या 39 राज्यामध्ये अखिल भारतीय मराठा सेवा संघाचे कार्य विस्तार झालेला आहे. नुकताच मराठा सेवा संघाच्या वर्धापन दिनी हा कार्यविस्तार करण्यात आला आहे.अकोला जिल्ह्यातील नियुक्ती जाहीर झाला मुळे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांचा नियुक्तीपत्र पुष्पगुच्छ देऊन जिल्हा परिषद नगर खडकी अकोला येथे सत्कार, गौरव करण्यात आला असून त्यांना पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आले आहे. येणारा काळात अकोला जिल्हा, विदर्भात मराठा सेवा संघाचे संघटन मोठ्या प्रमाणात वाढून समाजातील लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम नवनियुक्त देण्याचे पदाधिकारी यांनी आपल्या सत्काराप्रसंगी मनोगत व्यक्त करताना केले. त्यांच्या या नियुक्तीमुळे विदर्भ ,अकोला जिल्ह्यामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
Post Views: 196