हिंगणघाटच्या प्रत्येक पुरग्रस्ताला मुख्यमंत्रीनिधीतून ३० हजारांची आर्थिक मदत द्यावी


हिंगणघाटच्या शिवसेना महिला आघाडीची मागणी
 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  21 Jul 2022, 8:36 PM
   

हिंगणघाट : शहराच्या जूनी वस्ती परिसरातील गाडगेबाबा चौक,तेलीपुरा चौक,विट्ठल मंदिर वार्ड आणि डांगरी वार्ड परिसरातील अतिवृष्टी व धरणातील पाणी शिरुन घरातील अन्नधान्न्य व जीवनावश्यक  सर्व वस्तू वाहून गेल्यात. घरातील भिंती पडून,टीनावाहून गेल्याने अनेक कुटूंबे उध्वस्त झाली‌.
      अशा परिस्थितीमध्ये सरकारने या पुरग्रस्त हिंगणघाट शहराच्या सर्व वार्डामधील गोरगरीब जनतेकडे लक्ष देऊन त्यांना प्रत्येकी ३०,००० रुपयाच्या  आर्थिक मदती द्याव्यात  अशी मागणी शिवसेना महिला आघाडी हिंगणघाट यांचे वतीने  मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. सौं संगीताताई कडू जिल्हा संघटिका, सौं माधुरी खडसे तालुका संघटिका, सौं धनश्री क्षीरसागर शहर उपसंघटिका, सौं कांता पराते,सौं भाग्यश्री पटटेवार,देवा शेंडे, प्रफुल क्षीरसागर,मनोज कोटकर,महेश खडसे, अमित मुळे व अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित उपस्थित होते.

    Post Views:  222


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व