सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अख्यारितीत परंतु परवानगी एमआयडीसी कडून! अजब अधिकाऱ्यांचा गजब कारभार...
बोईसर - तारापूर ह्या मुख्य रस्त्यालगत फलक करिता स्ट्रक्चर उभे केले आहे. या स्ट्रक्चरचा वरील भाग मुख्य रस्त्याच्या अगदी कडेपर्यंत आल्याने त्यावर रात्रीच्या अंधारात अवजड किंवा प्रवासी वाहन आदळून अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही तसेच स्ट्रक्चरच्या बाजूने उच्च दबाची विद्युत वाहिनी गेल्याने त्या ठिकाणी मोठी एखादी दुर्घटना घडू शक्यते. असे चित्र असताना संबंधित विभागाचे अधिकारी मूग गिळून गप्प बसले आहेत.
बोईसर - तारापूरकडे जाणाऱ्या एमआयडीसी नाका व तारापूर अणुऊर्जा केंद्राच्या कर्मचारी वसाहतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ जाहिरात फलक लावण्यासाठी लोखंडी स्ट्रक्चर उभी केली आहेत .या रस्त्यावर अहोरात्र प्रचंड अवजड व प्रवासी वाहतूक होत असते. रस्त्यावर जाहिरात फलक लावण्यासाठी ठेकेदार कंपनीने लोखंडी स्ट्रक्चर मुख्य रस्त्यापासून अवघ्या ८ ते १० फुटांवर उभारले आहेत. त्या स्ट्रक्चरवर जाहिरात लावण्यासाठी जे लोखंडी अँगल आहेत, त्याचा बराचसा भाग रस्त्यापर्यंत आल्याने तारापूर अणुऊर्जा प्रकल्पासाठी असणाऱ्या आपत्कालीन मार्गाला याचा अडथळा उद्भवू शकतो. तसेच लगत उच्च दाबाची विद्युत वाहिनी गेली असल्याने मोठी दुर्घटना घडण्यापासून रोखणे कसरतीचे नक्कीच ठरणारे असेल.
तारापूर औद्योगिक क्षेत्रात फलक लावण्याचा ठेका हा हर्ष इंटरप्राईजेसला देण्यात आला आहे. या कंपनीने तारापूर औद्योगिक क्षेत्र नाका व टॅप्स गेटदरम्यान २० मीटर रुंद व २० मीटर उंच असणारे फलक बसवण्यासाठी स्ट्रक्चरचे काम हाती घेतले आहे.
सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून मुख्य रस्त्यापासून विशिष्ट अंतर सोडणे अनिवार्य असताना या फलकाचा पाया रस्त्यापासून काही अंतरावर आहे, तर होर्डिंग्ज टॉवर उभारलेली जागा सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत असून टॉवर बांधण्याची परवानगी महाराष्ट्रराज्य औद्योगिक विकास मंडळाकडून घेण्यात आली आहे. हाच तर अजब अधिकाऱ्यांच्या गजब कारभार आहे.
Post Views: 63