मेळघाटातील मोटरसायकल चोराला उरळ पोलिसांकडून अटक
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
2022-03-04
मोरगांव भाकरे (प्रतिनिधी अशोक भाकरे)
बाळापूर तालुक्यातील निंबा फाटा येथून चोरीला गेलेली मोटरसायकल हस्तगत करून मेळघाटातील एका चोरट्याला उरळ पोलिसांनी अटक केली.
लोहारा येथील असलम सलीम पटेल यांची रू.४० हजार किंमतीची मोटरसायकल क्र.एम.एच.२८ ए.एम.८३१४ एचएफ.डिलक्स ही निंबा फाटा येथून अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार त्यांनी उरळ पोलीस स्टेशनला दिली.त्या अनुषंगाने तपास करून ही कारवाई करण्यात आली.या तपासप्रकरणात पोलीस पथकाने निंबा फाटा येथील सी.सी कॅमेरे तपासून शेगांव येथून घेतलेल्या गोपनिय माहितीच्या आधारे आरोपी विशाल मंगल धांडे वय २२ या धारणी तालूक्यातील नागझिरा येथील आरोपीला शेगांव येथून अटक करण्यात आली.ही कारवाई उरळचे ठाणेदार अनंतराव वडतकार यांचे मार्गदर्शनात निंबा बिट जमादार संतोष भोजने,रवी हिंगणे,व इंगळे यांनी केली. आरोपीने चोरीची कबूली दिली असून त्याचेजवळून मोटरसायकल जप्त करण्यात येऊन अपराध क्र.५१/२२ कलम ३७९ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला.प्रकरण न्यायालयात दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
Post Views: 526