डाॅ. प्रतिमा इंगोले यांना मिळालेला एकशे अठ्ठावीसावा कथादीप पुरस्कार
अकोला - पुण्याच्या साहित्यदीप प्रतिष्ठान या अखिल भारतात प्रसिद्ध असणार्या संस्थेने डाॅ.प्रतिमा इंगोले यांना त्यांच्या एकंदर कथालेखनाबद्दल हा पुरस्कार दिला आहे. डाॅ. प्रतिमा इंगोले यांचे आतापर्यंत तेरा कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्या प्रत्येकाला एकेक अथवा दोन ते तीन पुरस्कार मिळाले आहेत.तिन कथासंग्रहाला शासनाचे राज्य पुरस्कार मिळाले आहेत. त्यांची नावे हजारी बेलपान, अकसिदीचे दाने, हॅट्ट्रिक अशी आहेत.इतर संग्रह सुगरनचा खोपा, जावायाचं पोर, लेक भुईची,हिरवे स्वप्न, अंधार पर्व, अमंगल युग,उलटे झाले पाय, येळी माय,पजाया, अशी आहेत.त्यांच्या कथांवर अनेकांना पीएच डी व एम फील मिळाली आहे.त्यांच्या कथा अभ्यास क्रमात आहेत.गढी कथा सध्या बारावीच्या अभ्यासक्रमात आहे.एस एन डी टी विद्यापीठात त्यांचा सुगरनचा खोपा अभ्यास क्रमात आहे.हा त्यांना मिळालेला एक शे अठ्ठावीसावा पुरस्कार असून त्याचे वितरण ता.२२.६.२०२४ ला पुणे येथे सावरकर अध्ययन संस्थेमध्ये सायंकाळी पाच वाजता होणार आहे.
Post Views: 143