पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करणार मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा


 विश्वप्रभात न्यूज ब्युरो  04 Jul 2022, 9:37 PM
   

मुंबई : राज्यात नव्याने अस्तित्वात आलेल्या शिंदे फडणवीस सरकारने आज विधानसभेत विश्वासदर्शक ठराव बहुमताने जिंकला आहे. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणादरम्यान जोरदार भाषण केले. आभार भाषाणादरम्यान, नवनिर्वाचित मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धडाकेबाज भाषण केले. यावेळी शिंदे यांनी सामान्य नागरिकांना दिलासा देणार्‍या तीन मोठ्या घोषणा केल्या. 
शिवसेनेचे मुख्य प्रतोद भरत गोगावलेंने हिरकणी गाव वाचवण्याची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी संबंधित गाव वाचवण्यासाठी शासनातर्फे 21 कोटींच्या निधीची घोषणा केली. याशिवाय लवकरच पेट्रोल डिझेलवरील व्हॅट कमी करून सामान्यांना दिलासा देणार असल्याची ग्वाही दिली आहे. त्यामुळे नव्या सरकारच्या काळात सामान्य जनतेला दिलासा मिळणार असल्याचे शिंदे म्हणाले.
शेतकरी आत्महत्यामुक्त महाराष्ट्र व्हावा, शेतकर्‍यांना हमीभाव मिळावा.  जलयुक्त शिवार सारथे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकर्‍यांच्या आयुष्यात अमूलाग्र बदल करण्याचा संकल्प सरकारने केला आहे.
जागतिक बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केंद्रीय कर कमी करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर देशातील काही राज्यांनी काही प्रमाणात व्हॅट कमी केला होता. मात्र, आपल्या राज्याने एक पैशाचाही व्हॅट कमी केला नव्हता. परंतु, राज्यात नव्याने अस्तित्त्वात आलेले युतीचे सरकार लवकरच यावरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय घेईल आणि महागाईने त्रस्त सामान्य नागरिकांना दिलासा देण्याचे काम करेल, अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली. राज्यातील हे सरकार बाळासाहेबांच्या विचारांचे असून, सर्वांना योग्य निधी दिला जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करत सर्वसामान्यांचे हे सरकार आहे. गेल्या 10 दिवसात आम्हाला भाजीवाला, रिक्षावाला अशा अनेक बिरुदावलींनी हिणवले गेले असे म्हणत केंद्रातील मोदी सरकार बाळासाहेबांचा अजेंडा चालवत असल्याचे शिंदे म्हणाले.

    Post Views:  229


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व