आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉन च्या वतीने डॉ रविंद्र भोळे महाराज सन्मानित
उरुळीकांचन :येथे आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ इस्कॉन च्या वतीने अध्यात्मिक कार्यक्रम ,प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते.ह्या प्रसंगी एच जी व्रजमाधव दास ह्यांचे सुश्राव्य प्रवचन झाले.ह्या कार्यक्रमात जेष्ठ समाजसेवक ,प्रवचनकार व अध्यात्मिक ,धार्मिक क्षेत्रात गेली तिस वर्षे समाजप्रबोधन करणारे ह. भ. प. डॉ रविंद्र भोळे ह्यांना सन्मानित करण्यात आले.एच जी सुदामा प्राण दास ह्यानी इस्कॉन च्या वतीने डॉ रविंद्र भोळे यांना सन्मानित केले.डॉ विनायक पाटील कोऑरडिनेटर इस्कॉन यांनी सूत्रसंचालन केले व डॉ रविंद्र भोळे यांच्या सामाजिक ,धार्मिक , अपंग सेवा व राष्ट्रसेवा कार्याची अल्पशी माहिती देऊन त्याना भारत सरकार च्या वतीने देण्यात येणारा पद्मश्री पुरस्कार मिळण्यासाठी अपेक्षा व्यक्त केली .उरुळीकांचन राममंदीर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी भाविक भक्त ,उपस्तित होते.
Post Views: 229