लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ वतीने एका निराधार विधवा महिलेस रेशन किट देऊन मदत...
विश्वाप्रभात न्यूज ब्युरो
21 Oct 2024, 10:32 AM
प्रमोद अंभोरे
परभणी - संपूर्ण महाराष्ट्रात मा. संजयजी देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी सतत निःस्वार्थ संघर्ष करणारी व सोबत समाजाचे काहीतरी देणे लागते या उदात्त भावनेने सामाजिक कार्यात अग्रेसर असणारी संघटना लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व परभणी शहरातील विविध सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य विषयक गेल्या 65 ते 70 वर्षांपासून कार्यरत असलेली शैक्षणिक संस्था माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी यांच्या वतीने आज दिनांक 20 ऑक्टोबर 2024 रोजी परभणी शहरातील डॉ. आंबेडकर नगर येथील लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ जिल्हा परभणी कार्यालय येथे एक गरजू निराधार विधवा महिला त्यांच्या 3 मुली व 1 मुलासोबत काही तरी मदत करा मागण्यासाठी आल्या होत्या. तेंव्हा त्यांना लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ चे परभणी जिल्हा सचिव तथा रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी सचिव तथा संपादक समाजहित न्यूज प्रमोद अशोकराव अंभोरे यांनी आधार देत त्या महिलेस व त्यांचा मुला बाळांना पोट भर जेवण देऊन व सोबत जाताना धान्य किट देऊन मदत करून त्यांच्या मुला बाळांचे शिक्षणासाठी व इतर जे काही खर्च करता येईल जमेल तशी मदत करण्याची लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने प्रमोद अशोकराव अंभोरे यांनी हमी दिली आहे तसेच एक मुलगा दत्तक घेऊन त्याच्या शिक्षणाची जवाबदारी घेतली आहे. ही मदत केल्याबद्दल सदरील महिलेने व त्यांच्या मुला बाळाने त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू येऊन लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ व माता रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी चे आभार मानले आहे. सदरील महिलेस मदत करण्यासाठी लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघ चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष मा. संजयजी देशमुख, महाराष्ट्र संघटक तथा प्रसिद्धी प्रमुख मा. भगीरथजी बद्दर, परभणी जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर, देवानंद वाकळे, वाजेद भाई, सामाजिक कार्यकर्ते शेख सरफराज, रमाबाई आंबेडकर शिक्षण प्रसारक मंडळ परभणी चे अध्यक्ष ऍड. सुभाष अंभोरे, सामाजिक कार्यकर्ते हरदीप सिंग बावरी, संदीप वायवळ, शेख कलीम, सिद्धार्थ शिंगारे, शेख अझहर आदींचे मार्गदर्शन लाभले आहे.
Post Views: 7