बार असोशिएशनच्या वतीने जिल्हा न्यायालयात शितल जलचा शुभारंभ व दिनदर्शिकेचे प्रकाशन


 Chief editor  07 Jan 2022, 4:39 PM
   

अकोला -न्यायालयात येणाऱ्या पक्षकार व वकील वर्गाला पिण्यासाठी शुद्ध जल उपलब्ध व्हावे यासाठी अकोला बार असोच्या वतीने न्यायालय परिसरात तीन आरो प्लांटची सोय करण्यात आली आहे.त्याच बरोबर विविध बाबींची परिपूर्ण माहिती असणाऱ्या बार असो ने काढलेल्या दिनदर्शिकेचा लोकार्पण सोहळा बुधवारी न्यायालय प्रांगणात मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

या लोकार्पण सोहळ्यात यावेळी जिल्हा प्रमुख सत्र  न्यायाधीश एन शिवराज खोब्रागडे,न्या.शायना पाटील, न्या. हर्षल भालेराव,न्या.ए के शर्मा,मुख्य न्याय दंडाधिकारी दिलीप पतंगे,न्याय शिल्पा बैस,न्या. एम भराडे मॅडम,न्या.राठी मॅडम,न्या.वसावे,न्या शेख, न्या.पाटील,न्या अग्रवाल,न्या हिंगमिरे,न्या जाधव,न्या. पुरी,महाराष्ट्र अँड गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष एड. बी.के. गांधी,बार असो.चेअध्यक्ष एड. राजेश जाधव,उपाध्यक्ष एड अनुप देशमुख, महिला उपाध्यक्ष एड संगीता भाकरे,सचिव एड पियुष देशमुख आदी  उपस्थित होते. यावेळी जिल्हा व सत्र खोब्रागडे यांनी जल केंद्राच्या आरओ वाटर प्लांटचे लोकार्पण करीत असो.च्या या लोकोपयोगी उपक्रमाचे कौतुक केले. यावेळी वकील वर्गांची माहिती व सदस्यांचे वाढदिवस,राष्ट्रीय पर्व व अन्य माहितीने परिपूर्ण असणाऱ्या विनामूल्य वितरित होणाऱ्या दिनदर्शिकेचे लोकार्पण करण्यात आले.प्रस्तुत दिनदर्शिका ही जिल्ह्यातील सर्व न्यायालये,रुग्णालये व अन्य कार्यालयात मोफत वितरित करण्यात येणार असल्याची माहिती एड जाधव यांनी यावेळी दिली.


संचालन असो.चे वरिष्ठ सचिव एड.सौरभ शर्मा यांनी तर आभार प्रदर्शन सचिव एड. धीरज शुक्ला यांनी मानले.यावेळी एड एस.जी.गवई,एड मंगला पांडे, एड.हेमंत मोहता,एड अनील शुकला,एड अनिस अहमद,एड उदय नाईक,एड आनंद गोदे,एड प्रवीण तायडे,एड शंकर ढोले,एड प्रशांत निर्मळ,एड रुपेश इस्तापे,एड भूषण काळे,एड रोहित पिंगळे,एड सुनील ठोसर,एड शेंडे,एड रामराणी,एड देशपांडे,एड व्यास, एड सुमेद डोंगरदिवे,एड सागर देशमुख,एड जितेंद्र अकोलकर,एड हरीश गोतमारे,एड राहुल मांगुळकर, एड गणेश परिहार,एड विशाल टीबडेवाल,एड अली रजा खान,एड देशमुख,एड संजय तळोकार, एड झांबरे,एड काळे,एड अजय लोंढे,एड शिवम शर्मा,एड सागर डवले,एड सुधिर गाडगे ,एड ठाकूर,एड उमेश तिवारी,एड राजनारायण मिश्रा,एड चंदू कोठारी,एड बाहेती,एड बियाणी,एड उंबरकरकर,एड इलियास शेखनी,एड परवेश मुजाहिद,एड शितल राऊत,एड विजया मुळे, एड रुंगठा मॅडम,एड गावंडे मॅडम,एड सरकटे, एड राजाराम ऊमाळे,एड अमोल चक्रे, एड गोविंद शर्मा,एड आशीष तिवारी,एड अविनाश गीते,एड पवनिश अग्रवाल, एड मो सलिम शेख समवेत बहुसंख्य वकील मंडळी उपस्थित होती.

    Post Views:  237


मुख्य संपादक
संजय एम. देशमुख




सहसंपादक
सतिश एम.देशमुख


सबंधित बातम्या

सर्व