अकोला काँग्रेस कमिटी च्या वतीने शहरातील ऑटो चालकांची नेत्र व दंत रोग तपासणी
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
04 Jul 2022, 12:18 PM
महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री नाना भाऊ पटोले व महाराष्ट्र काँग्रेस कमिटी डॉक्टर सेल चे अध्यक्ष डॉ श्री मनोज जी राका यांच्या निर्देशना नुसार व अकोला जिल्हा वैद्यकीय आघाडीच्या वतीने अकोला शहरातील ऑटोरिक्षा चालकांची मोफत नेत्र, दंत व मुख रोग तपासणी व उपचार शिबिराचे दि 3 जुलै रविवार रोजी स्वराज्य भवन येथे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिरात अकोला शहरातील बसंती चॅरिटेबल हॉस्पिटल च्या वतीने नेत्र तपासणी डॉ नेहा मंत्री यांनी केली तर जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने दंत चिकित्सक डॉ अब्दुल कहार कुरेशी, डॉ स्नेहल सावळे, व डॉ रोशनी यांनी तपासणी केली. या शिबिरात गरजवंत 150 रुग्णांनी लाभ घेतला.
या शिबीराचे आयोजन अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष अशोक अमानकर व जिल्हा वैद्यकीय आघाडी अध्यक्ष डॉ मिलिंद पवार यांनी केले. सदर शिबीर यशस्वी करण्यात महानगर अध्यक्ष डॉ प्रशांत वानखडे, महानगर उपाध्यक्ष कपिल रावदेव, सेवादल अध्यक्ष श्री तशवर पटेल, बा. टाकळी चे सरचिटणीस डॉ सय्यद तन्वीर सामाजिक कार्यकर्ते अफसर भाई, ऑटो युनियन चे माजी अध्यक्ष जाफर भाई तसेच महासचिव संघटन व प्रशासक मो. युसूफ यांचे मोलाचे सहकार्य लाभले, असे एका निवेदना द्वारे कळविण्यात आले.
Post Views: 123