रोटरी क्लब अकोला ईस्ट चा दिमाखदार पदग्रहण सोहळा संपन्न
विश्वप्रभात न्यूज ब्युरो
2023-06-27
(विजय बाहकर) अकोला : जगातून पल्स पोलिओ ची उच्चाटन करण्यासाठी रोटरी इंटरनॅशनल चा सिंहाचा वाटा असलेल्या सेवाभावी संस्थेच्या अकोल्यातील रोटरी क्लब अकोला ईस्टचा पदग्रहण मुख्य अतिथी बुलढाणा अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि.चे चेअरमन मा. राधेश्यामजी चांडक, प्रमुख अतिथी पीडीजी Rtn राजे संग्राम सिंह भोसले नागपूर, ADG Rtn सुनील जी नवघरे खामगांव आणि व्यासपीठावरील प्रमुख अतिथींनी दिनांक २४ जून २०२३ ला सायंकाळी सात वाजता माहेश्वरी भवन अकोला येथे दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत नवनियुक्त अध्यक्ष Rtn मोहित भाला यांना माजी अध्यक्ष Rtn ओंकार गांगडे यांनी नियमाप्रमाणे अध्यक्षपदाची संपूर्ण सूत्रे सोपवली. तसेच प्रशासकीय सचिव म्हणून Rtn संजयजी पिंपरकर, प्रकल्प सचिव म्हणून Rtn वैजनाथ कोरकने यांनाही त्यांचा पदभार सोपवण्यात आला. माननीय राधेश्यामजी चांडक, राजे संग्रामसिह भोसले यांनी रोटरी पीन नवनिर्वाचित अध्यक्ष मोहित भाला, प्रशासकीय सचिव Rtn संजय पिंपरकर, प्रकल्प सचिव वैजनाथ कोरकने यांच्या कोटाला लावून सन्मान केला.
सन्माननीय राधेश्यामजी चांडक यांनी आपले विचार व्यक्त करतांना उदाहरण देऊन सांगितले की मुंबईला हॉटेलमध्ये राहण्यासाठी एका रात्रीचे दोन ते तीन हजार भाडे देतो, आपण पृथ्वीवर जन्माला आल्यानंतर जी माता आपले आयुष्यभर भरणपोषण करते त्या पृथ्वीला आपल्याला आयुष्यभराचे भाडे द्यावेच लागणार, त्या भाड्यापोटी आपण फक्त आणि फक्त दरवर्षी झाडे लावा, झाडे जगवा असे सुचविले.तसेच त्यांनी रोटरीचे विद्यमान अध्यक्ष आणि सर्व रोटरीयन यांना सांगितले की एक प्रकल्प कमी झाला तरी चालेल पण झाडे लावा,झाडे जगवा.तसेच अन्नाची नासाडी करू नका,अन्न हे पूर्णब्रह्म म्हणतो पण शुभप्रसंगी होणाऱ्या कार्यक्रमा मध्ये जवळपास १ लाख १२ हजार कोटी रुपयांच्या अन्नाची नासाडी दरवर्षी होते, ती वाचविली पाहिजे.

त्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष व त्यांच्या टीमला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नागपूर घराण्याचे प्रमुख अतिथी PDG राजे संग्राम सिंह भोसले यांनी आपल्या मार्गदर्शनात द्रोपदी ने दुर्योधनास आंधळ्याची मुलं आंधळीच असतात असे म्हटल्यामुळे महाभारत घडले. शब्द हे शस्त्र आहे जपून वापरा. एकमेकांना समजून घ्या, मतभेद असावेत पण मनभेद असू नये. राजे संग्राम सिंह यांनी रोटरी क्लब ऑफ ईस्ट च्या डायलिसिस प्रोजेक्ट ला अकोला येथील बसंती बाई चांडक धर्मदाय रुग्णालयात राबवित असलेल्या डायलिसिस प्रोजेक्ट ला आवर्जून भेट देऊन प्रकल्पाचे कौतुक केले. रुग्णालयातील इतर विभागालाही भेट दिली. रुग्णालयाचे प्रभारी विजयजी मुंदडा यांनी पुष्पगुच्छ देऊन राजे संग्रामसिह भोसले यांचे स्वागत केले. सर्वश्री रोटेरियन ब्रिजमोहन चितलांगे, डॉ.जयंतीलाल वाघेला, डॉ. रघुनाथ खडसे ,ओंकार जी गांगडे एडवोकेट श्रीनिवास खोत, रमणजी राठी ,संजय पिंपरकर अशोक अग्रवाल ,मनोहर विरवाणी, नितीन अमीन ,अशोक मुंदडा, सौ पूनम मुंदडा, संजय हेडा , पंचशीलजी चौधरी,विजय बाहाकर आदी रोटेरियन सुद्धा बसंती बाई चांडक हॉस्पिटल मध्ये हजर होते.
तसेच माजी अध्यक्ष Rtn ओंकार गांगडे यांनी वर्षभरात राबवलेल्या प्रोजेक्ट बद्दल माहिती दिली. रोटरीयन सदस्यांनी वर्षभर मदत केल्याबद्दल सर्वांना धन्यवाद दिले. नवनिर्वाचित अध्यक्ष Rtn मोहित भाला यांनी रोटरी क्लब राबवित असलेले प्रकल्प अधिक जोमाने राबवू व रोटरी क्लब ईस्ट अकोला चे अमृत भोज, डायलेसिस प्रोजेक्ट, ऑर्थोपेडीक लायब्ररी, आदी प्रोजेक्ट अधिक प्रयत्न करून राबवू, या कामात अकोल्यातील रोटरी क्लब मेन चे अध्यक्ष एडवोकेट Rtn रवी शर्मा, रोटरी क्लब सेन्ट्रल चे अध्यक्ष Rtn साकेत राठी ,रोटरी क्लब मिटडाऊन चे अध्यक्ष Rtn संदेश रांदळ, रोटरी क्लब ॲग्रो सिटी चे अध्यक्ष निरज देशमुख, रोटरी क्लब नॉर्थ च्या अध्यक्षा डॉ.शिल्पा चिराणीया व त्यांचे पदाधिकारी आणि रोटेरियन माझ्या पदग्रहण सोहळ्याला उपस्थित राहिल्या बद्दल धन्यवाद देऊन आमच्या प्रोजेक्ट ला सहकार्य करावे अशी अपेक्षा व्यक्त केली.
रोटरी क्लब अकोला ईस्ट व दिव्यांग फाउंडेशन अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने आणि गुजरात अंबूजा एक्सपोर्ट लि. सोबत 25 व्हीलचेअर उपलब्ध करून देण्याचा संयुक्त प्रकल्प आहे. रोटरी क्लब ऑफ अकोला ईस्ट आणि दिव्यांग फाउंडेशन अकोला गरजू दिव्यांगांना गुजरात अंबुजा एक्सपोर्ट लिमिटेड सी एस आर फंड अंतर्गत पंचवीस व्हीलचेअर प्रदान करणार आहे.त्यापैकी दोन व्हीलचेअर मा. राधेश्यामजी चांडक PDG राजे संग्राम सिंह भोसले, ब्रिजमोहन चितलांगे आदी मान्यवरांच्या हस्ते गरजू दिव्यांगांना देण्यात आल्या.व एक व्हीलचेअर रोटरी क्लब ऑफ अकोला ईस्ट चालवित असलेल्या जलाराम मंदिर अकोला येथील ऑर्थोपेडीक सेंटर ला देण्यात आली.
व्यासपीठावर प्रमुख अतिथी सोबत सर्वश्री रोटेरियन विद्यमान अध्यक्ष मोहित भाला,माजी अध्यक्ष ओंकार गांगडे, संजय पिंपरकर, वैजनाथ कोरकने, विजय जानी, मयूर सिंघानिया,विशाल तडस आदी रोटेरियन होते.
विद्यमान अध्यक्ष मोहित भाला यांच्यासोबत पदाधिकारी म्हणून सर्वश्री रोटेरियन ओंकार गांगडे ,संजय पिंपरकर ,सौ पूनम मुंदडा,संजय गांगुर्डे ,संजय श्रावगी ,वैजनाथ कोरकने, प्रकाश दाते, संजय हेडा, संचालक म्हणून ब्रिजमोहन चितलांगे, एस एस खोरीया, सौ भारती शेंडे, विशाल तडस, रमणजी राठी, अजय सेंगर, मनोहर विरवाणी , मनीष शेठी, पुरुषोत्तम श्रावगी पदग्रहण सोहळ्याला उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. प्राची पिंपरकर व सौ संगीता गांगुर्डे व आभार प्रदर्शन डॉ. जयंतीलाल वाघेला यांनी केले.कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
Post Views: 153